खुशखबर! राज्य सरकारकडून HSRP नंबर प्लेट बाबत मुदतवाढ

HSRP नंबर प्लेट बाबत सरकारकडून वाहनधारकांना मोठा दिलासा तीन महिन्याची मुदत वाढ

सविस्तर वृत्त :जुन्या गाड्यांना HSRP नंबर प्लेट बसवणं राज्य शासनाने अनिवार्य केले होते. त्याची अंतिम मुदत 15 ऑगस्ट 2025 पर्यंत होती. पण आता लाखो वाहनधारकांना दिलासा देणारा राज्य सरकारने घेतला आहे.

राज्य शासनाने  दिनांक 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना HSRP ही नंबर प्लेट बसवण्याचा आदेश दिला होता. ज्याची मुदत शुक्रवारी 15 ऑगस्ट ला संपणार होती. यामुळे  ही नंबर प्लेट न बसवणाऱ्या लाखो वाहनधारकांना दंड लागणार होता. पण आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेत लाखो वाहनधारकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. जुन्या वाहनांना आता 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

15 ऑगस्ट रोजी याची अंतिम मुदत संपणार असल्याने लाखो वाहन धारकांना दंडाचा फटका बसणार होता. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्याप्रमाणे आता राज्य सरकारने मुदतवाढ जाहीर केली आहे. तर याविषयी जयंत पाटील यांनी, लाखो वाहनधारकांना HSRP नंबरप्लेट बसविण्याची इच्छा आहे. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे आणि किचकट प्रक्रियेमुळे ते आतापर्यंत शक्य झालेले नाही. त्यात मोठ्या अडचणी येत आहेत. तर सरकारच्या परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सुमारे 70 टक्के जुन्या वाहनांवर HSRP प्लेट्स अद्याप बसवण्यात आलेल्या नाहीत. यामुळे सरसकट कारवाई होण्याची भीती अनेकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सरसकट कारवाई न करता, मुदतवाढ करावी अशी विनंती जयंत पाटील यांनी केली होती

राज्य शासनानं HSRP नंबर प्लेट बाबत नवीन कालमर्यादेचा निर्णय घेतला आहे. आता 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे लाखो वाहनधारकांना जवळपास साडे तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे. पण आता जे या मुदतीनंतरही एचएसआरपी नंबर प्लेट बसवणार नाहीत. त्यांच्यावर 1 डिसेंबरपासून कारवाई केली जाणार आहे. पण यातून ज्यांनी अपॉइंटमेंट घेतली आहे, ते या कारवाईतून वाचतील आणि त्यांना कुठलाही दंड आकारण्यात येणार नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *