मुंबईत महिलेची ४४ लाखांची आर्थिक फसवणूक.

शेअर्स खरेदीविक्रीतून नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून महिलेची सायबर फसवणूक करण्याचे उघडकीस आले आहे .

सविस्तर वृत्त: एकीकडे सायबर क्राईमचे ऑनलाईन गुन्हे वाढत असताना त्यात अजून एक सायबर गुन्ह्याची घटना मुंबईत घडली आहे. फेसबुक वरून आरोपी महिलेच्या संपर्कात आले त्यानंतर ते आरोपी वेगवेगळ्या नंबरने फोन करून महिलेच्या संपर्कात होते. आरोपीने महिलेला शेअर्स बाजारात चांगला नफा मिळवून देतो त्यासाठी एक mobile app डाऊन लोड करण्यास सांगितले होते तसेच या महिलेने आरोपींवर विश्वास ठेऊन app डाऊनलोड करून शेअर बाजारातील काम आरोपींच्या सांगण्यावरून सुरु केले. सुरुवातीला महिलेला त्या app वरून चांगला नफा ही होत असल्याचे तिला दिसून आले म्हणून महिलेने लालच मध्ये येऊन ४३ लाख ८७ हजार रुपये आरोपींनी सांगितलेल्या बँक खात्यात हस्तांतरीत केले .

जमा झालेली रक्कम app मध्ये दिसली. काही कालांतराने महिलेला काही तरी गडबड असल्याचे दिसून आले. कारण तिला मिळणारा नफा हा त्या app मधून बंद झाला होता तिने हा सर्व प्रकार पाहून आपल्या सोबत सर्वात मोठा सायबर गुन्हा झाल्याचे तिच्या लक्षात आले. तिने लगोलगच सर्व गोष्टींची कल्पना आपल्या पतीला दिली. महिलेचे पती हे राष्ट्रीयकृत बँकेत व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत त्यांना हा प्रकार समजताच दोघांनी ह्या प्रकरणी मध्यप्रादेशिक सायबर पोलिसांकडे तक्रार केली, त्या नुसार पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे आणि आरोपींना पकडण्याचे आश्वासन सायबर गुन्हे पोलिसांनी दिले आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *