पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी यांनी मुंबईच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे

सविस्तर वृत : भाजपच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचेस्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीने मुंबईतील निवासस्थानी शनिवारी 22 नोव्हेंबरआत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. डॉ. गौरी पालवे यांनी गळफास घेऊन आयुष्य संपविल्याची घटना उघड झाली असून, अनंत गर्जे आणि डॉ. गौरी यांचा विवाह यंदाच्या 7 फेब्रुवारीला झाला होता. लग्नानंतर अवघ्या दहा महिन्यांत त्यांनी वरळीतील घरात हे टोकाचं पाऊल उचलल्याचे समजते. शनिवार सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास त्यांनी गळफास घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. कौटुंबिक कलहातून ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे
अनंत गर्जे आणि डॉ. गौरी यांचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. नवीन संसाराची स्वप्ने पाहत असतानाच हा दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. ७ फेब्रुवारी रोजी या जोडप्याने लग्नगाठ बांधली होती. मात्र, वरळीमध्ये डॉ गौरी गर्जे यांनी स्वत:ला संपवल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अनंत गर्जे यांचे विवाहबाह्य संबंध होते. त्यावरून गर्जे दाम्पत्यांमध्ये वाद, भांडण सुरू होती. यातून डॉ. गौरी यांनी आत्महत्या केली असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. गर्जे यांनी सांगितले की, घटनेच्या वेळी ते घरी नव्हतो, असं सांगत त्यांनी स्पष्ट केले असून घरात प्रवेश केल्यानंतर समोर आलेल्या धक्कादायक परिस्थितीचे वर्णन त्यांनी केले.अनंत गर्जे आणि डॉ. गौरी यांचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. नवीन संसाराची स्वप्ने पाहत असतानाच हा दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
या घटनेनंतर पंकजा मुंडे यांनी आपले बीडमधील सर्व कार्यक्रम रद्द केल्याची माहिती आहे. दरम्यान, कुटुंबीय गुन्हा दाखल व्हावा यासाठी आग्रही आहेत. तर, आत्महत्या केलेल्या त्यांच्या मुलीच्या मृतदेह रुग्णालयात असून त्यावर पोस्टपार्टम केले जाणार आहे. पोस्टमार्टममधून सत्य बाहेर येईल, असे सांगितले जात आहे. दरम्यान, पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहदोन-तीन महिन्यांपासून या दोघांच्यात वाद सुरू होता. गौरीला अनंतचे अफेअरच्या प्रकरणाची माहिती झाली होती. तरीही तिने त्याला माफ केलं. पण तो पुन्हा चॅटिंग करताना सापडल्यामुळे त्यांचा वाद टोकाला गेला. अंनत तिला खूप टॉर्चर करायचा असंही गौरीचे मामा शिवदास गर्जे यांनी सांगितलं आहे.
या घटनेनंतर मृत तरुणीच्या कुटुंबीयांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. आपली मुलगी आत्महत्या करूच शकत नाही, तर तिची हत्या करण्यात आल्याचा दावा तिच्या आई-वडिलांनी केला आहे. सध्या मुलीचे कुटुंबीय वरळी पोलीस स्टेशनमध्ये असून त्यांनी सासरच्या मंडळींवर संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेण्यास सुरुवात केली असून पुढील चौकशी सुरू आहे.
