चित्रपटातून गुन्हेगारांना सळो की पळो करुन सोडणाऱ्या शेट्टींच्या घराला खऱ्या आयुष्यात अज्ञात बदमाशांनी लक्ष्य केले.

सविस्तर वृत : सिंघम, गोलमाल अशा अनेक प्रसिद्ध चित्रपटांचे निर्माते आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील निवासस्थानी काल रात्री झालेल्या गोळीबाराने मुंबई हादरली आहे. पडद्यावर आपल्या चित्रपटातून गुन्हेगारांना सळो की पळो करुन सोडणाऱ्या शेट्टींच्या घराला खऱ्या आयुष्यात अज्ञात बदमाशांनी लक्ष्य केले. या खळबळजनक घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे
प्रसिद्ध बॉलिवूड निर्माते आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या मुंबईतील घराबाहेर गोळीबाराची घटना घडलीये, ज्यानंतर मोठी खळबळ उडाली. पोलिस आणि फॉरेन्सिक पथके घटनास्थळाची चौकशी करत आहेत. या घटनेने बॉलिवूडमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला होता. फक्त गोळीबारच नाही तर त्याच्या घराची रेकी करण्यात आल्याचीही घटना उघडकीस आली. मुंबई पोलिसांनी अवघ्या काही तासात सलमान खान याच्या घरावर गोळीबार करणाऱ्यांना अटक केली. या घटनेला काही दिवस उलटले असतानाच आता रोहित शेट्टी याच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला. बिश्नोई टोळीकडून गेल्या काही दिवसांपासून सलमान खानला धमक्या दिल्या जात होत्या. मात्र, रोहित शेट्टी याच्या घराबाहेर नक्की कोणी गोळीबार केला? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे
घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांचे उच्चपदस्थ अधिकारी आणि मुंबई गुन्हे शाखेची पथके घटनास्थळी दाखल झाली. सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. हल्लेखोरांच्या पळण्याच्या मार्गाचा शोध घेण्यासाठी पोलीस ‘शेट्टी टॉवर’ आणि आसपासच्या इमारतींमधील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. तसेच, फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या पथकाने घटनास्थळावरून गोळ्यांच्या रिकाम्या पुंगळ्या आणि इतर पुरावे गोळा केले आहेत. मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून, इमारतीवर गोळीबार झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. सध्या मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखा या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
