उद्धव ठाकरे यांच्या गाडीवरील मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्याबाबत प्रसार माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांची सूचक प्रतिक्रिया…..

सविस्तर वृत्त: दोन दिवसांपूर्वी अमरावती दौऱ्यावर असलेले राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांच्या काही पदाधिकार्यांनी राज ठाकरे यांच्या गाडी समोर सुपाऱ्या फेकून राज ठाकरेंसमोर घोषणा बाजी केली. हा प्रकार घडल्यावर राज यांनी थेट उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना सज्जड इशारा दिला. त्या वरून उद्धव ठाकरे यांची सभा ठाण्यामध्ये असताना उद्धव ठाकरे यांचा ताफा रस्त्यातून जात असताना मनसैनिकांनी उद्धव ठाकरेंच्या गाडीवर शेण फेकून हमला केला. ह्या सर्व तणावाच्या वातावरणात पोलिसांनी संयमाने दोन्ही पक्षकारांना शांत करून हे प्रकरण हाताळले आणि हे कृत्य करणाऱ्या मनसैनिकांना ताब्यात घेतले ठाण्यामध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण आहे.
अशातच मुख्यमंत्री यांनी विविध मुद्यांवरून आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली होती. त्यात पत्रकारांनी घडलेल्या उद्धव ठाकरेंच्या गाडीवर झालेल्या हमल्या बाबत विचारणा केली असता मुख्यमंत्री यांनी सूचक प्रतिक्रिया दिली.
प्रतिक्रिया अशी दिली की, “अॅक्शनला रिअॅक्शन…” ही मिळणारच,.असा खोचक टोला मा. मुख्यमंत्री यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
