अनेक दिवसाच्या शोध मोहीम करून तीन माणसांचा जीव घेणाऱ्या बिबटयावर वनविभाग कडून कारवाई लोकांनी सोडला सुटकेचा निश्वास

सविस्तर वृत : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेड आणि परिसरात गेल्या 20 दिवसांपासून सुरू असलेल्या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये तिघांचा बळी गेला होता. अखेर वनविभागाने नरभक्षक बिबट ठार केलं आहे. यामुळे नागरिकांनी काहीसा सुटकेचा निश्वास सोडला आहे.
12 ऑक्टोबर 2025 रोजी सहा वर्षाच्या शिवन्या बोंबे, 22 ऑक्टोबर रोजी 70 वर्षांच्या भागुबाई जाधव आणि 2 नोव्हेंबर रोजी 13 वर्षांच्या रोहन बोंबे या तिघांचा दुर्दैवी मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाला होता. या बिबट्याच्या हल्ल्यात सलग झालेल्या या दुर्दैवी घटनांमुळे शिरूर परिसरामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
बिबट्याच्या हल्ल्याने मृत्यू झाल्यानंतर संतप्त नागरिकांच्या मागणीची घेतली दखल घेत शिरूर तालुक्यातील दोन बालकांसह तिघांचा जीव घेणाऱ्या बिबट्याला दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश अखेर वनविभाकडून देण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी पिंपरखेळ येथे बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षांच्या शिवन्या बोंबेचा मृत्यू झाला होता. २२ ऑक्टोबर रोजी भागाबाई रंगनाथ जाधव (वय ७०, मौजे जांबुत, ता. शिरूर) या वृद्ध महिलेचा याच बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर शनिवारी (दि. १) रोहन विलास बोंबे या १३ वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला करत त्याला ठार केले होते. सातत्याने नागरिकांवर होणाऱ्या बिबट्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर जीव घेणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात यावे, अशी मागणी सातत्याने केली जात होती. मात्र, त्याला यश येत नव्हते. त्यामुळे आक्रमक झालेल्या नागरिकांनी आंदोलन करत जाळपोळदेखील केली होती. अखेर त्या बिबट्याला ठार करण्यात यश आलं आहे
नरभक्षक बिबट्या जेरबंद किंवा ठार करण्यासाठी वन विभागाने रेस्क्यू संस्था पुण्याचे डॉ. सात्विक पाठक पशु चिकीत्सक, जुबिन पोस्टवाला व डॉक्टर प्रसाद दाभोळकर या दोन शार्प शूटरसह वनविभागाची टीम घटनास्थळ परिसरात तैनात करून सदर नरभक्षक बिबट्यास जेरबंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली. मंगळवारी दिवसभर परिसरात ठिकठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावून बिबट्या ज्या मार्गावरून फिरत आहे, त्या ठिकाणावरील ठशांचे निरीक्षण करण्यात आले. त्यानंतर रात्री तीन थर्मल ड्रोनच्या माध्यमातून घटनास्थळाच्या परिसरामध्ये त्या नरभक्षक बिबट्याचा शोध घेतला असता घटनास्थळापासून सुमारे 400 ते 500 मीटर अंतरावर बिबट्या दिसून आला. यावेळी वन विभागाच्या पथकाने त्याला बेशुद्ध करण्यासाठी डार्ट मारला, परंतु तो अपयशी ठरल्याने बिबट्या चवताळून वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी बंदूकधारी शार्प शूटर यांनी बिबट्यावर रात्री 10.30 वाजताच्या सुमारास गोळी झाडली. ज्यामध्ये बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर या नरभक्षक बिबट्याचे शव मौजे पिंपरखेड येथील ग्रामस्थांना दाखविण्यात आले.
