अनेक वर्षाच्या मेहनतीनंतर भारतीय महिला क्रिकेट संघाने वर्ल्ड कप भारताला जिंकून दिला

अंतिम सामन्यात ऐतिहासिक विजय नोंदवत पहिल्यांदाच विजेतेपदावर नाव कोरले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम लढतीत भारताने 52 धावांनी दणदणीत मात केली

सविस्तर वृत : भारतीय महिला क्रिकेट संघाने 2025 च्या महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऐतिहासिक विजय नोंदवत पहिल्यांदाच विजेतेपदावर नाव कोरले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम लढतीत भारताने 52 धावांनी दणदणीत मात केली. हा विजय भारतीय क्रीडा इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला आहे. या विजयानंतर देशभरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले

अनेक वर्षाच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर भारतीय महिला क्रिकेट संघाने अखेर पहिला आयसीसी वर्ल्ड कप जिंकला आहे. अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी हरवून इतिहास रचला. वुमेन्स टीमचा हा कारनामा पाहण्यासाठी आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांच्यासह अनेक रोहित शर्मापासून क्रिकेटचा देव देखील उपस्थित होता

माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर म्हणाला, “भारताचं मनापासून अभिनंदन! भारतीय मुलींनी अप्रतिम खेळ केला आणि त्या निश्चितच या विजयासाठी पात्र होत्या. त्यांनी देशाला आनंद साजरा करण्याची संधी दिली. टीम इंडियाची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही उच्च दर्जाची होती. पूर्ण आत्मविश्वासाने मैदानात उतरलेला भारतीय संघ व्यापक विजय मिळवण्यात यशस्वी ठरला, याचा मला अत्यंत आनंद आहे,” असं अख्तरने सांगितलं

अनेक चाहत्यांनी भारताच्या विजयाबद्दल पूर्ण विश्वास व्यक्त केला. 2025 हे वर्ष भारतासाठी खूपच लकी असून, या वर्षी भारत सर्व ट्रॉफी जिंकणार असल्याचा विश्वासही चाहत्यांनी व्यक्त केला. भारतीय महिला संघाचा हा ऐतिहासिक विजय खूप अभिमानास्पद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *