अजित पवारांना दाखवले काळे झेंडे ……….

सविस्तर वृत्त: विधानसभेचे वारे वाहत असताना सर्व पक्षांमधून कार्यकर्ता मेळावे, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आणि कार्यकर्त्यांचे साक्षमिकरण करण्यास सर्व पक्षांतील मंत्री आपापल्या मतदार संघात जाऊन सभा यात्रा करत आहेत. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज रविवार दिनांक १८ ऑगस्ट रोजी जुन्नुर तालुक्यातील नारायण गाव येथे जनसंम्मान यात्रा आयोजित कार्यक्रमांसाठी गेले असता तेथे मोठा गोंधळ पाहायला मिळाला.
तेथे कार्यक्रमास्थळी महायुती सरकार मधील भाजपच्या कार्यकर्त्यांनी येऊन मोठा गदारोळ केला, आणि अजित पवारांना त्या कार्यक्रमात विरोध दर्शविला”. अजित पवारांना या पदाधिकार्यांनी व कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून अजित पवारांविरोधात निदर्शने केली. भाजप कार्यकर्त्यांच्या तसेच पदाधिकार्यांच्या विरोधामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता दर्शविली जात आहे. या सर्व घडलेल्या गोष्टींवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी संतापून प्रतिक्रिया दिली, “ते म्हणाले कोणीही महायुतीच्या एकतेला गालबोट लाऊ नये” यावर त्यांनी आपला निषेध वर्तवला.
