आज मुख्यमंत्री फडणीस यांच्या हस्ते बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील सदनिकानचे वितरण

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बीडीडी चाळ वासियांची स्वप्नपूर्ती, 556 सदनिकांचे वितरण

सविस्तर वृत्त :1920 पासूनच्या बीडीडी चाळीने स्वातंत्र्य चळवळ, सामाजिक व राजकीय आंदोलनांचा इतिहास पाहिला आहे. अनेक पिढ्यांपासून येथे राहणारे कुटुंब, त्यांच्या श्रमातून उभी राहिलेली ही मुंबई आणि येथील भिंतींमध्ये दडलेल्या त्यांच्या हजारो आठवणी… हे सर्व जपणारी ही वसाहत आज नव्या स्वरूपात उभी आहे.सुमारे 90 वर्षे प्रलंबित असलेले खटले निकाली काढून, खासगी विकासकांच्या नफ्याच्या गणितावर आधारित केवळ 300–325 चौरस फूट घरांची मर्यादा नाकारून, म्हाडामार्फत 500 चौरस फूट प्रशस्त घरे देण्याचा ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतला.

आशियातील सर्वात मोठ्या नागरी पुनर्निर्माण प्रकल्पासाठी जागतिक निविदा मागवून, देशातील आणि जगातील प्रतिष्ठित विकासकांना काम देण्यात आले. आज वरळीतील एकट्या प्रकल्पातून सुमारे 9000 घरे, तर संपूर्ण योजनेतून 14,000 घरे उपलब्ध होणार आहेत.मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज माटुंगा, मुंबई येथे वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील 556 पुनर्वसन सदनिकांचे वितरण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 15 चाळवासियांना प्रातिनिधिक स्वरूपात सदनिकांच्या चावीचे वितरण करण्यात आले.

सरकारचे काम करण्याचे तत्त्व सर्वसमावेशक आहे. कोणी कितीही टीका केली तरी आम्ही मुंबईकरांच्या जीवनमानात गुणात्मक बदल घडवण्याचे काम करत राहू, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.

या ऐतिहासिक क्षणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री ॲड. आशिष शेलार, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, खासदार मिलिंद देवरा तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *