केंद्रातून जीएसटी बद्दल नवीन अपडेट समोर.

जीएसटी मध्ये सर्व सामान्यांच्या संबंधित महत्वाचे निर्णय…

सविस्तर वृत्त: नवी दिल्लीत जीएसटी संदर्भात आज ५४ वी बैठक पार पडली. त्यामध्ये अनेक मोठे निर्णय घेण्यात आले अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या अद्यक्षतेखाली वस्तू आणि सेवा कर परिषद पार पडली, यामध्ये औषधांवरी जीएसटी (कर्करोग) ,स्नॅक्स वरील कर (नमकीन) या शिवाय वैद्यकीय विम्याचे प्रीमियम वरील जीएसटी कमी करण्याच्या विचाराने एक समिती स्थापन करण्याचे निर्णय केंद्रातून घेण्यात आला अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी जीएसटी संदर्भात दिलेले निर्णय :

  • परदेशी विमान कंपन्यांना यात दिलासा दिला गेला आहे. परदेशी विमान कंपन्याकडून दिल्या जाणाऱ्या प्रवाशी सेवांना जीएसटी मधून मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • धार्मिक यात्रेवेळी हेलिकॅप्टर सेवा स्वस्त केली जाणार. पर्यटनासाठी अनेक पर्यटक धार्मिक पर्यटनासाठी देशांतर्गत प्रवास करीत असतात. या सेवांमध्ये दर कमी करून ५% वर आणण्यात आला आहे. या आधी १८ % जीएसटी पर्यटकांना द्यावा लागत होता. आता बद्रीनाथ आणि केदारनाथला हेलिकॅप्टरने जाणाऱ्या भाविकांच्या खिशाला सुट मिळणार आहे
  • नमकीन स्नॅक्स १८% वरून १२ % करण्याचे निर्णय घेण्यात आला आहे. त्या मुळे ६% जीएसटी कमी झाल्यामुळे नमकीन खाणाऱ्या ग्राहकाला आता नमकीन कमी किंमतीत मिळणार आहे.
  • केंद्राकडून कर्करोगाची औषधांवर १२% जीएसटी होता तो आता कमी करून ५% वर करण्यात आला आहे सरकारकडून ७% चा फायदा कर्करोगाची औषधे घेणाऱ्या रुग्णांना मिळणार आहे. केंद्राकडून कर्करोगाच्या वाढत्या रुग्णांना लक्षात ठवून हा निर्णय घेण्यात आला आहे असे सांगण्यात येत आहे .
  • वैद्यकीय विमा हा भारतातील ६०% लोकं काढतात त्याच्या प्रीमियम वरील जीएसटी कमी करण्याच्या निर्णयावर सरकार विचार करीत आहे. त्यासाठी निर्मला सीतारामण यांनी एक समिती स्थापन केली आहे ही समिती प्रीमियम वरील जीएसटी किती कमी करावा हे अभ्यास करून ऑक्टोबरच्या शेवट अखेरीस सांगणार आहे .
  • ओनलाईन गेमिंग वरील बैठकीत चर्चा झाली ओंनलाईन गेमिंग वर जीएसटी लावली असता सरकारच्या महसुलात ४००% हून अधिक वाढ झाल्याचे सीतारामण यांनी सागितले.
  • केंद्राने उभारलेले विद्यापीठ संशोधन केंद्रे राज्य सरकारच्या कायद्याच्या आधारे  स्थापन करण्यात आलेली विद्यापीठे यांना प्राप्तिकरात सूट मिळाली आहे . ही सार्वजनिक आणि खाजगी या दोघांकडून ही संशोधन निधी मिळवू शकतात त्यांना आता कोणताही जीएसटी कर भरावा लागणार नाही .

केंद्राकडून सामान्य नागरिकांसाठी जीएसटीच्या ह्या सवलती घेवून नागरिकांच्या खिशाला परवडेल अश्या रीतीने जीएसटीचे दर कमी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *