महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीची शक्यता.

महाविकास आघाडीला आणि महायुतीला महाराष्ट्रात मोठा धक्का बसण्याची शक्यता…

सविस्तर वृत्त: महाराष्ट्रात विधानसभा निवडनुकीचे वारे वाहण्यास सुरु झाले आहे. नेत्यांच्या गाठीभेटी सुरु झाल्या आहेत. महाराष्ट्रातील निवडणुका जरी थोड्या लांबणीवर गेल्या असल्या तरी देखील महाराष्ट्रात अनेक नेत्यांमध्ये सत्तेला घेवून खलबत चालू आहेत, ह्याच खलबतांचा परिणाम म्हणजे जसजसा निवडणुकीच्या तारखां जाहीर होण्याआधीच वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुती सरकर आणि त्यांचे घटक पक्ष असे दोन बलाढ्य सत्ता कार्यरत आहेत. त्यांच्याच तोडीलातोड विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहेत. विधानसभेसाठी तिसऱ्या आघाडीची चाचणी सुरु झाली आहे.

त्यामध्ये बच्चू कडू (प्रहर पक्ष प्रमुख), डॉ राजरत्न आंबेडकर (अध्यक्ष दि.बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया), छत्रपती संभाजी राजे (स्वराज्य पक्ष प्रमुख), नारायण अंकुशे (अध्यक्ष भारतीय जवान किसान पार्टी) हे प्रमुख नेते एकत्र येवून नांदेड मध्ये आणि परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या विविध मुद्द्यांवर भेटीगाठी करणार आहेत. नांदेड आणि परभणी मध्ये शेतकऱ्यांची कैफियत ऐकून घेणार आहेत. जागा वाटपासाठी छोट्या आघाडी पक्षांनी महाविकास आणि महायुती आघाडी सोबत जागा वाटप संदर्भात बोलणी सुरु केली आहेत, आधीच महायुती आघाडी मध्ये तीन पक्ष असल्याने छोट्या पक्षांच्या वाट्याला खूप कमी जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे, ह्या शक्यतेमुळे विविध पर्याय अवलंबून महायुती आणि महाविकास आघाडी सरकारच्या मोठ्या नेत्यांवर दबाव टाकण्यासाठी छोटे पक्ष अशा पर्यायांचा अवलंबन करत असतात. राज्यातील ह्या तिसऱ्या आघाडीच्या प्रयोगाला सुद्धा ह्याच दृष्टीकोनातून पहिले जात आहे.

राज्यात विधानसभा निवडणुका ह्या २०२४ च्या शेवटी लागण्याची दाट शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीला लक्षात घेवून तिसरी आघाडी ही आपली ताकद अजमवताना देसून येत आहे. असे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे कारण, हे नेते एकत्र येवून पुढे कोणती खेळी खेळणार आहेत? हा देखील प्रश्न राजकीय विश्लेषक करत आहेत, जर ह्या नेत्यांनी एकत्र येवून तिसरी आघाडीची स्थापना केली तर महायुती आणि महाविकास आघाडीला खूप मोठे परिणाम भोगावे लागू शकतात, असे मानले जात आहे. आणि तिसरी आघाडी ही विधानसभा निवडणुकीत दिसते कि, नाही? हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे…!

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *