जम्मू-काश्मिरच्या लोकांनी नॅशनल कॉन्फरन्स आघाडीला सत्ता स्थापनेचा कौल दिला

 

जम्मू-काश्मिरमध्ये १० वर्षांनी सत्ता परिवर्तन

 

 

सविस्तर वृत्त : जम्मू-काश्मिरमध्ये तब्बल 10 वर्षांनी निवडणूक पार पडली. याआधी 2014 मध्ये विधानसभा निवडणूक झाली होती. त्यावेळी भाजप आणि पीडीपने एकत्र येत सत्ता स्थापन केली होती. पण 2018 मध्ये भाजप आणि पीडीपी वेगळे झाले. त्यानंतर काही महिन्यांनी केंद्र सरकारने 5 ऑगस्ट 2019 मध्ये जम्मू-काश्मिरमधऊन आर्टिकल 370 हटवलं आणि लढाखला वेगळ्या केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा दिला. यावेळच्या निवडणुकीत जम्मू-काश्मिरला पूर्ण राज्याच्या दर्जा देण्याचा मुद्दा महत्त्वाचा ठरलाजम्मू काश्मिरमध्ये काँग्रेस  आणि नॅशनल कॉन्फरन्स  आघाडी सरकार स्थापन करणार आहे.

विधानसभा निवडणूकीतील  90 जागांपैकी  काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स आघाडीने 49 जागा पटकावत बहुमत मिळवलंय. तर भाजपाला 29 जागांवर समाधान मानावं लागलंय. इतरांना 9 जागा मिळाल्यात. विजयानंतर नॅशनल कॉन्फरन्स आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला  यांनी मतदारांचे आभार मानत ओमर अब्दुल्ला हे जम्मू-काश्मिरचे नवे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा केली. जम्मू-काश्मिरमध्ये कलम 370 हटवण्याचा निर्णय मान्य नसल्याचं इथल्या जनतेने आपल्या मतदानातून दाखवून दिल्याचं फारुख अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे. पुढच्या पाच वर्षात जम्मू-काश्मिरमध्ये बेरोजगारी, महागाई आणि अंमली पदार्थांचा व्यापार संपवण्यासाठी आम्ही काम करु असंही फारुख अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे.

जम्मू-काश्मिरमध्ये 90 जागांपैकी काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स आघाडीने 49 जागांवर विजय मिळवला. तर 29 जागांव भाजपने बाजी मारली. महबूबा मुफ्ती यांच्या पीडीपीला अवघ्या 3 जागा मिळाल्यात. माजी मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती हिलाही पराभव पत्कारावा लागला. विशेष म्हणजे जम्मू-काश्मिरमध्ये आम आदमी पार्टीने खातं खोललं आहे. आप उमेदवार मेहराज मलिक यांनी डोडा मतदार संघात विजय मिळवला. जम्मू-काश्मिरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. तर भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे. फारुख अब्दुल्ला यांनी निकालानंतर जम्मू-काश्मिरच्या लोकांचे आभार मानत ओमर अब्दुल्लांच्या नावाची घोषणा केली. ओमार अब्दुल्ला हे बडगाम आणि गांदरबल या दोन जागांवर निवडणूक लढवत होते, आणि दोन्ही जागांवर त्यांनी मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *