बातमी-ता.श्रीवर्धन(रायगड)
१ ऑगस्ट रोजी श्रीवर्धन तालुक्यामध्ये ब्रिटीश काळात १८९३ मध्ये सार्वजनिक वाचनालयाची स्थापना झाली.हे श्रीवर्धनच्या इतिहासातील पहिले सार्वजनिक वाचनालय आहे.येथील काही शिक्षित लोकांनी एकत्र येऊन ह्या वाचनालयाची सुरवात केली.याचे मूळ उद्दिष्ट येथील विध्यार्थ्यांना,शिक्षकांना आणि जेष्ठ नागरिकांना तसेच वाचनाची आवड असणाऱ्या सर्वांनाच याचा लाभ व्हावा,लोकांना मुबलक किंमतीत पुस्तके मिळवता यावी आणि आपला तालुका कसा साक्षर राहील ह्या कडे भर दिला गेला.हीच परंपरा आज दिनांक १ ऑगस्ट २०२४ पर्यंत सेवा पुरवण्यात येथील नागरिकांना आज १३२ वर्ष झाली आणि निरंतर हिच सेवा भविष्यातील पिढीला प्राप्त होईल.असे वाचनालय व्यवस्थापन समितीने सांगितले.
