अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री पदाचा लवकरच त्याग करणार…

सविस्तर वृत्त: आप चे सर्वस्व अरविंद केजरीवाल हे मागच्या एक ते दीड वर्षापासून जेल मध्ये बंद होते. त्यांची आताच सुप्रीम कोर्टाकडून जामिनावर काही अटी व शर्ती लावून सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. अरविंद केजरीवाल यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर आपच्या नेत्यांमध्ये आणि दिल्लीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण तयार झाले होते. केजरीवाल हे दिल्लीत मुख्यमंत्री बनल्यापासून त्यांनी दिल्लीत शिक्षण क्षेत्रात महिला वर्गासाठी, शेतकऱ्यांसाठी अनेक मुलभूत गरजा दिल्ली वासियांना मोफत व मुबलक दरात मिळवून दिल्यात. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्यावर दिल्ली वासीय खुश होते पण अरविंद केजरीवाल जेल मधून बाहेर आल्यावर त्यांनी आता एक सभेमध्ये सांगितले कि, “मी आता राजीनामा देणार आहे”. दोन दिवसांमध्ये विधी मंडळ दिल्लीचा नवीन मुख्यमंत्री निवडेल. दिल्लीतील जनता जो पर्यंत निर्णय देत नाही तो पर्यंत मी मुख्यमंत्री खुर्चीवर बसणार नाही असे त्यांनी सभेमध्ये जाहीर पणे सांगितले. मी प्रत्येक घरात जावून लोकांजवळ बोलणार आहे आणि पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये निवडणुका होणार आहेत. पण मी निवडणूक आयोगाला विंनती करतो कि, त्यांनी ह्या निवडणुका नोव्हेंबर मध्येच घ्याव्या, आता सर्व काही लोकांच्या हाती आहे. असे केजरीवाल म्हणाले कोर्टाने मला जामीन जरूर दिला आहे, पण हे प्रकरण १५ ते २० वर्ष कोर्टात चालू राहू शकते. आता जनतेने ठरवावे कि, जनता मला काय समजते, प्रामाणिक कि, गुन्हेगार त्यामुळे मी माझ्या सी एम पदाचा राजीनामा देत आहे.

दिल्ली विधान सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. कोर्टाने दिलेल्या जामिनामध्ये काही अटींमुळे मुख्यमंत्री म्हणून काम कारणे अवघड जाणार होते. अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अरविंद केजरीवाल सध्या मुख्यमंत्री असले तरी कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना सहीचा कोणताही अधिकार दिलेला नाही. त्यांना प्रत्येक गोष्ट एल जी यांच्या सल्ल्यानेच करावी लागणार. सही चा अधिकारच नसेल तर पद काय कामांचे यामुळे देखील केजरीवाल राजीनामा देत आहेत. अशा ही चर्चांना उधाण आले आहे. केजरीवाल यांच्या राजीनाम्याच्या या वक्तव्यावरून केजरीवाल यांची एक मोठी खेळी असल्याचे ही सांगितले जात आहे. आणि केजरीवाल नंतर आप मध्ये नवीन मुख्यमंत्री कोण बनणार हे देखील पाहणे दिल्ली वासियांसाठी अपेक्षित असणार आहे…!
