भाजप चा राज्यात नवीन संकल्प.

१२५ जागा जिंकण्याचा मनसुबा…

सविस्तर वृत्त: विधानसभा निवडणुकीला लक्षात ठेवून अनेक मोठे राजकीय पक्ष अपापल्या स्तरावर दिल्लीमध्ये भेटीगाठी करून राज्यातील विधानसभा निवडणुकीला समोर ठेवून रणनीती आखत आहेत. त्यातच भाजप हा सत्ताधारी पक्ष असून एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे त्याचे मित्र पक्ष आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा महाराष्ट्र दौर्यामध्ये अनेक भाजपच्या नेत्यांची कोर कमिटीची मिटींग केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीत जवळपास ५० जागांवर भारतीय जनता पक्षाला निवडून येण्याची खात्री असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे उरलेल्या ७५ जागा ह्या भाजपातील प्रमुख नेत्यांवर टाकण्यात आल्या आहेत.

तर महायुती मधील मित्र पक्षांमधील कलह आणि अंतर्गत वाद चवाटयावर अणु नये असे अमित शहा यांनी भाजप नेत्यांना खडसावून संगितले आहे. गेल्या लोकसभेच्या निवडणुकींना लक्षात ठेवून भाजपच्या जिंकून अलेल्या जागांचा विचार करून भाजपामध्ये सर्वांनी सयंम बाळगून एकजूट राहावे अशी सूचना ही अमित शहा यांनी भाजप नेत्यांना दिली आहे. अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे तर महायुतीतील प्रमुख नेत्यांसोबत होणाऱ्या बैठकीत जागा वाटपावरून चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, अमित शहा यांनी भाजप नेत्यांना अनेक मोठे कान मंत्र दिले आणि भाजपला विधानसभा निवडणुकीमध्ये कसे आघाडीवर ठेवता येईल या बद्दल ही भाजप अंतर्गत बैठकीत अमित शहा यांनी भाजपचे प्रमुख नेते यांना सांगितले आहे. प्रत्येकांनी आपापल्या जबाबदाऱ्या सांभाळून निवडणुकीला सामोरे जाण्याचे आव्हाहन अमित शहा यांच्या कडून करण्यात आले आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये अमित शहा यांनी दिलेल्या कानमंत्रांचा उपयोग भाजपचे प्रमुख नेते किती पाळतात? हे बघणे ही अपेक्षित असेल..!

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *