माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठवाड्यात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्तांची भेट घेऊन  पूरग्रस्तांच्या मदतीवरून सरकारची कान उघडणे केली.

सविस्तर वृत : मराठवाड्यातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी दौरा केला. लातूर आणि धाराशिव येथील पूरग्रस्त भागांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांनी सरकारकडे हेक्टरी 50,000 रुपये मदत आणि सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करण्याची मागणी केली. त्यांनी शेतकऱ्यांचे सातबारा कोरे करण्याचीही मागणी केली. सरकारने जाहीर केलेल्या मदतीला त्यांनी अपुरी असल्याचे म्हटले.

राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळीच्या आत कर्जमाफी न झाल्यास शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून दिवाळीनंतर रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना आम्ही केलीली कर्जमुक्ती राज्यातील शेतकरी आजही विसरले नाहीत. त्यामुळे येत्या काळात सरसकट कर्जमुक्ती करण्याची गरज आहे. त्यामुळे तातडीने शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी हे सांगत असताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अडचण सोडवत पीएम केअर फ़ंडातून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा मार्ग सुचवला आहे

यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकाराने उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याबद्दल विचारणा केली असता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दौऱ्यावर टीका केली आणि उद्धव ठाकरे यांच्यावर पर्यटन करण्याचा आरोप केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *