सिनेट निवडणुकीत ठाकरेंचा बोलबाला

आदित्य ठाकरेंचा सिनेट निवडणुकीत दस का दम

 

सविस्तर वृत्त : विजय काय असतो हे काल आदित्य ठाकरेने दाखवून दिलं आहे. हा दस का दम आहे. 2008 मध्ये ही 10 पैकी 8 जागा जिंकल्या. नंतर दहा पैकी दहा जागा जिंकल्या. आता पुन्हा २०२४ मध्ये 10 पैकी10 जागा जिंकल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्यावर जनतेचा विश्वास आहे. ही विधानसभेची लिटमस टेस्ट नव्हती. ही प्रिपरेशनची रनउप  होती, अशा शब्दांत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी विजयानंतर प्रतिक्रिया दिली.मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये ठाकरे गटाच्या युवासेनेच्या उमेदवारांनी 10 पैकी 10 जागा जिंकल्या. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील युवा सेनेने सिनेट निवडणुकीत क्लीन स्वीप मारून पुन्हा एकदा विद्यापीठावर आपलाच दबदबा असल्याचं दाखवून दिलं. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच ठाकरे गटाला या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत निर्भेळ यश मिळाल्याने आनंदाचे वातावरण आहेयाच विजयानंतर आज मातोश्री येथे गुलाल उधळण्यात आला. शिवसैनिकांनी मातोश्री बंगल्याबाहेर जल्लोष केला. एसर्वांचे कमेकांना पेढे भरवले गेले. आनंद व्यक्त केला गाण्याच्या ठेक्यावर कार्यकर्त्यांनी ताल धरला. आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांना खांद्यावर घेऊन जल्लोष करण्यात आला. आदित्य साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है, उद्धव साहेब अंगार है, बाकी सब भंगार आहे, कोण आला रे कोण आला… शिवसेनेचा वाघ आला अशा घोषणा कार्यकर्त्यांकडून यावेळी  देण्यात आल्या.  आदित्य यांनी त्यांची आई रश्मी ठाकरे आणि भाऊ तेजसला गुलाल लावला. तेजसने आदित्य ठाकरे यांची गळाभेट घेऊन त्यांचं अभिनंदन केलं. यावेळी आदित्य ठाकरेंनी विजया बद्दल सर्वांचे आभार  मानून अभिनंदन करत उपस्थितांना संबोधित केलं. विजय काय असतो हे काल आपण दाखवून दिलं आहे. आणि आपण करून दाखवलं आहे. ही सुरुवात आहे. असाच विजय विधानसभेत आपल्याला मिळवायचा आहे. ही आजपासूनची सुरुवात आहे. गुलाल उधळला आहे. हाच गुलाल विधानसभेच्या निवडणुकीला उधळायचा आहे. त्यासाठी कामाला लागा,अशा सूचना त्यांनी मातोश्रीवर उपस्थित कार्यकर्त्यांना दिल्या  हा दस का दम आहे. आता पुन्हा दहा पैकी दहा जागा जिंकल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्यावर जनतेचा विश्वास आहे. ज्यांना जायचं त्यांना जाऊ द्या. जनतेचा आमच्यावर जो विश्वास आहे, तो कायम आहे. पदधवीधर आणि शिक्षक मतदारसंघ आम्ही जिंकलो आहोत. आता सिनेटही जिंकली आहे. आदित्य ठाकरे म्हणाले. आम्ही कोर्टाचे आभार मानतो. कोर्टाने आमची सुनावणी तात्काळ घेतली. निवडणूक आयोगाकडे एकच विनंती आहे की त्यांनी भाजप कार्यालयाकडून निवडणुका घेण्याची परवानगी घ्यावी. राज्यात कायदा सुव्यवस्थेची बिघाड झाली आहे. राज्याला गृहमंत्री आहे की नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे हाय अलर्ट रोजचाच आहे अशी टीका आदित्य यांनी केली.महापालिकेच्या निवडणुका घ्या. दोन वर्ष प्रलंबित आहे. विधानसभेच्या निवडणुकाही घ्या अशी मागणीही त्यांनी केली सिनेट निवडणुकीत दहा पैकी दहा जागा जिंकल्यावर ठाकरेंचा विश्वास फुढील येणाऱ्या विधानसभा आणि महानगर पालिका या निवडणुकीसाठी वाढला आहे सिनेट निवडणूकित ठाकरेंना यश मिळाल्या नंतर विरोधाकाना येणारा काळ हा विचार करण्यास भाग पडणारा असेल असे राजकीय वर्तुळात चर्चा चालू झाल्या आहेत

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *