फडणवीस यांच्या कार्यालायची नासधूस

सविस्तर वृत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात अज्ञात महिलेने गोंधळ घालत नासधूस केली. तिने संपूर्ण कार्यालय तोडफोड केले तोडफोडी नंतर महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले या घटनेवर पत्रकारांच्या प्रश्नावर आता स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच ही प्रतिक्रिया देताना त्यांनीविराधोकांच्या प्रश्नांना उतरे देयून विरोधकांना लक्ष्य केले आहे. शिर्डी येथे लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत असताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कार्यालयात नासधूस झाल्याची घटना कालची आहे. त्या महिलेचे काय म्हणणे होते, तिने हे कशाकरीता केले, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. तिने हे कृत्य उद्विगणतेमधून केले का? किंवा तिचे म्हणने काय आहे? हे समजून घेण्याचा प्रयत्न केला जाईल.
दरम्यान लाडक्या बहिणीचा राग अनावर झाला का? म्हणून उपमुख्यमंत्री कार्यालयात तिचा असंतोष पाहायला मिळाला, अशी टीका विरोधकांनी केली आहे. या टीकेबाबतही फडणवीस यांना मध्यामान कडून प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “विरोधकांकडे कोणतेही मुद्दे शिल्लक राहीले नाहीत. त्यामुळे ते आता अशी टीका करत आहेत. एखादी बहीण चिडली असेल तर आम्ही पाहून घेऊ.आणि तिला समजू कुणी जाणीवपूर्वक पाठविले असेल तर तेही आम्ही पाहून घेऊ. गृहमंत्र्याचेच कार्यालय सुरक्षित नसेल तर लाडक्या बहिणी कशा सुरक्षित राहतील? असाही प्रश्न यावेळी माध्यमान कडून फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, विरोधकांची सत्ता असताना मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात येऊन लोकांनी रॉकेल ओतून घेतलेले आहे. मंत्रालयात कुणाचीच अडवणूक केली जात नाही. काही लोक आपले प्रश्न मांडण्यासाठी वरच्या मजल्यावरून जाळीवर उडी घेतात. याचा अर्थ ते आमचे विरोधक नाहीत. त्यांच्या अडचणी समजून घेऊ. सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही मंत्रालयाचे दरवाजे सामान्यांसाठी बंद करू शकत नाही. अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्या बदल माध्यमांनी विचरला असता फडणवीस म्हणले कि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे महाराष्ट्रात दौरे वाढत आहेत. बैठकांचे सत्र सुरूच आहे. यावर बोलताना ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अमित शाह हे कार्यकर्त्यांशी विभागवार बैठक घेऊन संवाद साधत आहेत. आता केवळ काही जिल्हे राहिले आहेत कार्यकर्त्यांना भेटण्या साठी ते हि फूढच्या महिन्याच्या सुरवातीला भेटून सर्व दौरे पूर्ण होतील फडणवीस यांच्या मंत्रालयातील अज्ञात महिले कडून जालेल्या तोडफोडी बदल चे अनेक चर्चांना उधान आले आहे
