लेह लडाख मध्ये आंदोलकांनी भाजप कार्यालय जाळून टाकले आंदोलनाला हिंसक वळण आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांकडून शीताफिचे प्रयत्न

सविस्तर वृत : लेह एपेक्स बॉडी (LAB) च्या आंदोलनाला बुधवारी हिंसक वळण लागले. आंदोलकांनी पोलिसांशी संघर्ष करत शहरातील भाजप कार्यालयाला आग लावली. आंदोलकांनी केंद्र सरकार आणि प्रशासन त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला आहे.
लेहमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारावरुन भाजप नेते आणि आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. आंदोलकांनी बुधवारी भाजपचं कार्यालय पेटवून दिलं. लेहमधील हिंसाचारामागे काँग्रेस नगरसेवक फुंटसोग स्टॅनजिन यांचा हात असल्याचा आरोप मालवीय यांनी केला आहे. यावर सोनम वांगचुक यांनी भाष्य केलं आहे. या भागात काँग्रेसचा इतका प्रभाव नाही. ५ हजार तरुण रस्त्यावर उतरण्याची ताकद काँग्रेसमध्ये नाही, असं वांगचुक म्हणाले
दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थिती पाहता भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 163 लागू केले आहे. त्यानुसार पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांची जमावबंदी आहे. कोणतेही मोर्चे, रॅली किंवा मिरवणुका जिल्हा प्रशासनाच्या परवानगीशिवाय करता येणार नाहीत. तसेच लोकशांततेला धक्का पोहोचवणारे कोणतेही विधान करणे बंदी घालण्यात आले आहे
लेह लडाख पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा रक्षकांनी आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केला. तिथूनच झटापट सुरु झाली. विद्यार्थ्यांच्या ४ प्रमुख मागण्या आहेत. लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा, सोबतच घटनात्मक सुरक्षा मिळावी, अशी त्यांची मागणी आहे. कारगिल आणि लेहसाठी लोकसभा मतदारसंघाची निर्मिती केली जावी आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना संधी मिळावी, अशा विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत
