विरार मध्ये नारंगी येथे इमारत कोसळून अनेक जण ढिगाऱ्या खाली गाढले गेले बचाव कार्य अजून ही चालु

सविस्तर वृत : पालघर जिल्ह्यातील विरारमधील नारंगी येथील रमाबाई अपार्टमेंट ही चार मजली इमारत मंगळवारी रात्री अचानक कोसळली. राज्यभरात गणेशोत्सवचा उत्साह असताना विरारमध्ये मात्र ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढले जात आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. अवघे 15 वर्षे जुनी इमारत कशी कोसळली, याबाबत अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.
बुधवारी ढिगाऱ्यामधून 20 ते 35 जण अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात 17 जणांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही NDRF चे सर्च ऑपरेशन सुरू आहे. ही इमारत अरुंद गल्लीत असल्याने येथे रेस्क्यू ऑपरेशनसाठी गाडी आणि रुग्णवाहिका पोहोचवणं कठीण झालं होतं. त्यात अधून मधून पावसामुळे ही ढिगारे उपसण्यासाठी वेळ लागत आहे त्यामुळे एनडीआरएफच्या टीमला मॅन्यूअली रेस्क्यू ऑपरेशन करावं लागलं. ज्यामुळे बराच वेळ लागला. अद्यापही इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री 12.05 च्या सुमारास इमारतीचा मागील भाग कोसळला. वसई विरार महानगरपालिकेने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी इमारतीच्या बिल्डरला अटक केली आहे. अधिकाऱ्यांनी आतापर्यंत आरोही ओंकार जोविल (24), त्यांची एक वर्षाची मुलगी उत्कर्षा जोविल, लक्ष्मण किस्कू सिंग (26), दिनेश प्रकाश सपकाळ (43), सुप्रिया निवलकर (38), अर्णब निवलकर (11) आणि पार्वती सपकाळ अशी सात मृतांची ओळख पटवली आहे आणखीन मृतदेहांची ओळख पटवणे बाकी आहे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील या घटनेचा आढावा घेऊन दुःख व्यक्त केला आहे दुर्घटनेत आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झालेला आहे, याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे आणि मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. या सर्व कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे सांगतानाच मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे.
48 तासांपासून एनडीआरएफच्या मदतीने हे बचाव कार्य राबवले जात आहे आणि ते पुढच्या काही तासात संपेल. आतापर्यंत 9 जणांना सुरक्षित वाचविण्यात आले आहे राबवले जात आहे आणि ते पुढच्या काही तासात संपेल. आतापर्यंत 9 जणांना सुरक्षित वाचविण्यात आले आहे.
