आर अश्विन यांची आयपीएलमधून तडका फडकी निवृत्तीची घोषणाविस्तर

सविस्तर वृत : भारतीय क्रिकेटपटू आर अश्विननेही आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे. याची घोषणा करताना त्याने एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्याने लिहिले, “आज माझी आयपीएल कारकीर्दही संपत आहे.” 16 वर्षांच्या आयपीएल कारकिर्दीत, अश्विनने एकूण 221 सामने खेळले. त्याने इंडियन प्रीमियर लीगमध्ये 5 संघांचे प्रतिनिधित्व केले. डिसेंबर 2024 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे
अश्विनची सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, “खास दिवस आणि म्हणूनच एक खास सुरुवात. ते म्हणतात की प्रत्येक समाप्तीची एक नवीन सुरुवात होते. आयपीएलमधील क्रिकेटपटू म्हणून माझी वेळ आज संपत आहे
आपल्या पोस्टमध्ये अश्विनने आयपीएलमध्ये खेळलेल्या सर्व लीगचेही आभार मानले. त्याने लिहिले, “गेल्या काही वर्षातल्या अद्भुत आठवणी आणि नातेसंबंधांबद्दल मी सर्व फ्रँचायझींचे आभार मानू इच्छितो. आणि आतापर्यंत मला जे काही दिले आहे त्याबद्दल बीसीसीआय आणि आयपीएलचे खूप खूप आभार. पुढे जे काही आहे त्याचा आनंद घेण्यासाठी आणि त्याचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी मी उत्सुक आहे.
