संजय राऊतांकडून मोदींना खोचक टोला …

सविस्तर वृत्त: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मालवण येथे पडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे लोकांच्या मनात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे, त्याला कारण ही असेच आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. तसेच परराष्ट्रामध्ये हे महाराजांचा मोठा सन्मान केला जातो, अशातच मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा २८ फुट उंच पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. तो सोमवारी दुपारी अचानक कोसळला, त्यामुळे मोठ्या वादाला सुरुवात झाली. महाराष्ट्र सरकारकडून हा पुतळा मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे पडल्याचे सांगण्यात आले. ह्या पुतळ्यावरून राजकारण देखील मोठ्या प्रमाणात तापले आहे, विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. त्या साठी महाविकास आघाडीचे नेते मालवण येथे गेले असता, भाजपाचे खासदार नारायण राणे आणि त्यांचा मुलगा तसेच स्थानिक कार्यकर्ते तसेच महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते यांच्या मध्ये आमने-सामने येऊन मोठा वाद झाला. पोलिसांच्या अथक परीश्रमाने हा वाद आटोक्यात आणण्यात पोलिसांना यश आले. या वरूनच ह्या सर्व बाबींना घेऊन संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेऊन प्रसारमाध्यमांना असे सांगितले की, हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखले जाते, पण नरेंद्र मोदी यांनी घाई-घाईने पुतळ्याचे उद्घाटन करून लोकसभा निवडणुकीसाठी मतांचा विचार करून पुतळ्याचे अनावरण केले. या शिल्पकाविषयी अनेक इतिहासकारांनी आक्षेप घेतले होते, तसेच संभाजी राजे यांनी सुद्धा बांधकाम आणि शिल्पकाविषयी आक्षेप घेतला होता तरी हा पुतळा घाई-घाईत बसवण्यात आला. औरंगजेब यानी देखील छत्रपतींचा त्याच्या काळात अपमान केला नसेल तो ह्या सरकारच्या काळात झाला.
आपल्याच राज्यात ही वेळ आली याला पंतप्रधान मोदी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे सार्वजनिकरित्या जबाबदार आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याने हे काम केले आहे, शिंदेंनी आपल्या मर्जीतल्या ठेकेदाराला शिल्प बनवण्याचे काम दिले होते, अशी माहिती समोर आली आहे. आज महाराष्ट्राने पहिल्यांदाच महाराजांच्या पुतळ्याचे पडलेले तुकडे पाहिले आहेत अशी महाराष्ट्रावर कधी वेळ येईल असे वाटले नव्हते, एवढे म्हणून त्यांनी शिंदे सरकारवर आरोप केले. एवढे सर्व होवून सुद्धा सरकारकडून कोणतेही ठोस पाऊले उचलली गेली नाही किंवा सरकारच्या कोणत्याही नेत्यांच्या चेहऱ्यावर वेदनाही दिसत नाही. सरकारकडून असे सांगण्यात आले आहे कि, जोरदार वाऱ्यामुळे हा पुतळा पडला पण १९३३ सालापासून गिरगाव चौपाटीवर लोकमान्य टिळकांचा पुतळा बसवण्यात आला आहे. अद्याप आजही तो जशास-तसा त्या काळापासून आज तागायत हा पुतळा खंबीर पणे उभा आहे. पण ८ महिन्यात सिंधुदुर्ग किल्यावरील महाराजांचा पुतळा पडतो म्हणजे किती निष्क्रिय दर्ज्याचे काम झाले आहे हे समजते. ह्या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी आधी या गोष्टीला घेऊन राजीनामा द्यावा असे ही त्यांनी माध्यमांसमोर सांगितले. जे शिवाजी महाराजांचे लाडके होऊ शकले नाही, ते लाडक्या बहिणींच्या गोष्टी करत आहेत त्यावर महाराष्ट्र स्वस्त बसणार नाही. आपल्या मराठीत एक म्हण आहे, “हात लावेल तिथे सोने होते” पण येथे मोदींबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले कि, मोदी जेथे हात लावतात तिथे माती होते. उदाहरण देताना त्यांनी सांगितले कि, “आयोध्येत राम मंदिर बनवले तेथे पाणी गळत आहे. नवीन संसद बनविली ती ही गळत आहे. जे पूल बांधले तेही आता उध्वस्त होत आहेत कोस्टल रोड देखिल गळत आहे”. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हात लावला तो ही पडला सत्तर वर्षातील हे पहिले पंतप्रधान आहेत जे कोणत्याही कामाला हात लावताच ते उध्वस्त होते माहित नाही ही श्रद्धा आहे कि, अंधश्रद्धा असे अनेक आरोप संजय राऊतांनी पीएम नरेंद्र मोदी आणि महायुती सरकारवर केले.
