डोंबिवली मध्ये चोरीचा नवीन प्रकार…….

सविस्तर वृत: डोंबिवली हे शहर एक गजबजलेले शहर म्हणून ओळखले जाते रोजच्या धकाधकीच्या जीवनात आणि वाढत्या सुखसोयींना घेऊन लोकांचा ओघ आणि खास करून(मराठी माणसांचा) डोंबिवली शहराकडे जास्त प्रमाणात बघण्यात आला आहे, वाढत्या शहरीकरणामुळे इकडे चांगली चांगल्या लोकांचे आणि कलाकारांचे नेहमीच वास्तव्य राहिले आहे. त्यातच डोंबिवली मध्ये चोरांचा ही सुळसुळाट आणि चोरी करण्याचा प्रकार वाढला आहे.
डोंबिवली मध्ये सध्या गोनी मध्ये तांदूळ कमी किमतीत विकण्यासाठी ह्या टोळ्या गल्लोगल्ली, इमारतीमध्ये जाऊन विकत आहेत या मध्ये खास करून बायकांचा समावेश आहे. त्यांच्या शेतातील तांदूळ (गावठी) आहे असे सांगून तांदूळ विकत घेण्यास ग्राहकाला सांगतात, तांदळाची गुणवत्ता तपासण्यासाठी तांदळाचा वास घेण्यास सांगतात अशा प्रकारे तांदळाचा वास देवून वशीकरण करतात वशीकरण झालेल्या व्यक्तीस घरातील रोख रक्कम, दागिने आणून देण्यास सांगतात व त्या नंतर तेथून पोबारा करतात.
सोसायटी किंवा इमारतींच्या बाहेर त्यांच्या रिक्षा किंवा गाड्या उभ्या असतात,त्यातून ते पलायन करतात. अशी घटना डोंबिवली मध्ये कोपरी गावात घडली आहे. पोलिसांनी ह्या गोष्टींवर तेथील नागरिकांना आव्हाहन केले आहे की, कृपया आपल्या घरी आलेल्या अनोळखी व्यक्ती कडून काहीही खरेदी करू नका, अशा टोळ्या तुम्हाला नजरेस पडल्यास किंवा संशयितरित्या, किंवा कृत्य करताना आढळल्यास जवळील पोलीस स्थानकात संपर्क करावा अशी पोलिसांकडून डोंबिवलीतील नागरिकांना विनंती करण्यात आली आहे.
