आरक्षण मुद्द्यावरून बांग्लादेशात तक्ता पलट

प्रधान मंत्री शेख हसीना यांचा राजीनामा

सविस्तर वृत्त :  बांग्लादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या आंदोलनाने उग्र रुप धारण केलं. या आंदोलनात आतापर्यंत अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती सुत्राकडून मिळाली आहे. आंदोलन इतके प्रचंड हिंसक झाले कि पंतप्रधान मा. हसीना शेख यांना तातडीने राजीनामा देऊन देश सोडावा लागला .त्यामुळे आता बांग्लादेशात लष्कर राजवट लागली आहे .बांग्लादेश हे भारताचे मित्र राष्ट्र असून मा .हसीना शेख यांचे सरकार भारतधार्जिणे असल्याचे सांगितले जात आहे, त्यामुळे बांग्लादेशी पंतप्रधान यांच्या राजीनाम्यानंतर भारत बांग्लादेश सीमेवर हाय अलर्ट जारी केला आहे बांग्लादेशातील ह्या हिंसाचाराला व तख्त पलटी मागे नेमकी कारणे कोणती हे राजकीय विश्लेषकांकडून ही आहेत  .

१ .हे आंदोलन शासकीय नोकरीत मिळणाऱ्या मुद्द्यावरून चालू आहे. १९७१ साली बांग्लादेशाची निर्मिती झाली त्यावेळी यालढ्यात जी क्रांतिकारी लोकं होती त्यांच्या वंशजांना मिळत असलेले आरक्षण कायम राहावे हे आंदोलन करत्यांचे मत आहे. आणि हे आरक्षण बंद व्हावे असे तेथील इतर गटाला वाटते आहे .

२. आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलकांनी शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी धरून ठेवली या सगळ्यासाठी मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळून आला त्या मध्ये अनेक आंदोलन कर्त्यांचे नाहक बळी गेले. आणि अनेक लोकं जखमी झाले. त्यामुळे ढाक्या मध्ये इंटरनेट सेवा पोलिसांकडून बंद ठेऊन अनेक ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली.

३. शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर लष्कर प्रमुख यांनी सांगितले लवकरच अंतरिम सरकार स्थापन करून बांग्लादेशात हिंसाचार आटोक्यात आणण्याचा प्रयत्न आहे .

४. बांग्लादेशातील हिंसाचारासंदर्भात भारताकडून नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या.  भारतीयांनी बांग्लादेशात जाऊ नये शक्यतो प्रवास टाळावा. बांग्लादेशमध्ये कामानिमित्ताने राहणाऱ्या भारतीयांसाठी आपत्कालीन दुरध्वनी क्रमांक जारी करण्यात आले आहेत त्यामुळे बांग्लादेशात अति तातडीने स्थिर सरकार स्थापन करणे तेथील लष्करासाठी आणि लोकासाठी अत्यंत महत्वाचे आहे