बदलापूर बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्त होणाऱ्या बंदला स्थगिती …..

सविस्तर वृत्त: महाराष्ट्रात वाढत्या बलात्कार प्रकरणावरून आणि बदलापूर मध्ये झालेल्या चिमुकलींच्या अत्याच्याराबद्दल जनाक्रोश झाला होता. त्या जनाक्रोशाने घेतलेल्या पावित्र्याबद्दल सरकारला ठणकावून जागे केले आहे. आणि ह्या घटनेला घेऊन सरकारच्याया दिरंगाईच्या कामगिरीबद्दल हाय कोर्टाने गृह खात्यावर ताशेरे ओढले आहे, ह्याच प्रकरणाला घेऊन सरकारने नवीन जी आर सुद्धा शाळांना पाठविला आहे. ह्या जी आर चे पालन न झाल्यास शाळांवर कार्यवाही करण्यात येईल. ह्या सर्व घडलेल्या घटना क्रमवार विरोधी पक्षाकडून सरकारवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करून त्यांनी सुद्धा सरकारच्या कामकाजावर बोट ठेवून सरकारला वेठीस धरून मुख्यमंत्री आणि गृह खात्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला आहे.सरकारच्याया हलगर्जीपणा मुळेच असे कृत्य महाराष्ट्रात वारंवार होत आहे, त्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षाकडून २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक महाराष्ट्रातील जनतेला देण्यात आली होती. ह्याचा हेतू हाच होता की, सरकारला आता तरी ह्या भूमिकेमुळे जाग येईल.
ह्या बंद च्या आव्हानासाठी उच्च न्यायालयामध्ये दोन याचिका दाखल करण्यात आल्या. त्या वर उच्च न्यायालयाने ह्या बंदला स्थगिती दर्शविली आहे.मुंबई उच्च न्यायालयाने असे म्हटले आहे कि, कोणत्याही राजकीय पक्षाला महाराष्ट्र बंद करण्याची परवानगी देता येणार नाही, असा कोणी प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी उच्च न्यायालयांनी असे राज्य सरकारला निर्देश दिले आहे.
ह्या आदेशावरून विरोधी पक्षाकडून जो बंद पुकारला होता. तो न्यायालयाचा आदर करून पत्रकार परिषद घेऊन बंद मागे घेतला आहे. पण विरोधी पक्षांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाला मान्यता दिली असली तरी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन असे सांगितले कि, देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य शिल्लक आहे का लोकांनी आपल्या भावना व्यक्त कशा करायच्या किंवा, व्यक्त करायच्या कि नाही? यावर घटनातज्ञांनी प्रकाश टाकला पाहिजे. आपला बहिणींची आईची काळजी घेतली पाहिजे त्यांचे सरंक्षण करण्याचा अधिकार सर्वांना आहे त्या मुळे उद्या सकाळी ११ वाजता ठिकठिकाणी तोंडाला आणि हाताला काळ्या फिती लावून बसणार आहोत जेणेकरून उद्या ह्या राज्यात असे काही पुन्हा घडले, महिलांवर पुन्हा अत्याचार झाले तर ज्यांनी ह्या याचिका केल्या आहेत ते जबाबदार राहणार आहेत का ? असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थितीत केला गेला. अशा काही गोष्टी विरोधकांकडून पत्रकार परिषदेत अधोरेखित करण्यात आल्या आणि उद्याचा महाराष्ट्र बंद हा पूर्णपणे विरोधकांकडून न्यायालयाचा सम्मान राखून घेण्यात आला आहे.
