निवडणूक आयोगाच्या भोंगाळ कारभाराविरुद्ध महाविकास आघाडी काढणार मोर्चा मनसे चे ही मोर्चाला समर्थन

निवडणुकीतील गैरव्यवहार याबाबतचा सत्याचा मोर्चा निघणार आहे.विरोधी पक्ष तसेच मतदार सुद्धा या मोर्चात होणार सामिल

सविस्तर वृत :  ऐक नोव्हेंबर शनिवारी निवडणूक आयोगाचा बेजबाबदार कारभार, मतचोरी, मतांमधील घोळ, निवडणुकीतील गैरव्यवहार याबाबतचा सत्याचा मोर्चा निघणार आहे. लोकांना सत्य कळावं आणि असत्य जनतेसमोर जावं यासाठी विरोधी पक्षाने, महाविकास आघाडीचे सर्व पक्ष, मनसे आणि जे जे सर्व या गोष्टींच्या विरोधात आहेत, मतदार देखील मोर्चात सामील होतील. मोर्चा दुपारी 1 वाजता फॅशन स्ट्रिटवरून सुरू होईल. मेट्रो सिनेमामार्ग मुंबई महापालिकेच्या प्रवेशद्वारावर थांबले” अशी माहिती उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी दिली. मतदार यादीतील घोळासंदर्भात येत्या 1 नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाविरोधात महाविकास आघाडीतील पक्षांचा मोर्चा निघणार आहे

मोर्चाच्या रणनीतीसाठी विरोधी पक्षाची तयारी सुरु आहे. त्यासाठी गुरुवारी दुपारी बैठक पार पडली. या बैठकीनंतर माविआच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे नेते सचिन सावंत उपस्थित होते. मतदार यादीतील घोळासंदर्भात येत्या 1 नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाविरोधात महाविकास आघाडीतील पक्षांचा मोर्चा निघणार आहे.

‘शरद पवार मोर्चाला उपस्थित राहणार’ असं अनिल परब यांनी सांगितलं. “मुंबईकरांना त्रास होऊ नये, यासाठी दुपारी 1 ते 4 या वेळेत मोर्चा निघणार आहे. आम्ही नोंदवलेल्या आक्षेपांवर आम्हाला न्याय मिळावा” असं अनिल परब यांनी सांगितलं. “आम्ही मतचोरीचा बारकाईने अभ्यास करतो. मतदार यादीतील घोळ दूर करा. आम्ही घेतलेल्या आक्षेपांवर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. चोक्कलिंगम यांनी जे सांगितलं त्यावरही अभ्यास करत आहोत. आमचा मोर्चा आमच्या आणि मतदारांच्या मागणीसाठी आहे” असं अनिल परब म्हणाले. “चोर चोऱ्या करणार. आमच्यावर गुन्हे दाखल करणार. रोहित पवार यांच्यावर दबाव टाकण्यासाठी गुन्हा दाखल केला.रोहित पवार वगैरे घाबरणारे नाहीत.बिनधास्त नडत आहेत.हा गांधी नेहरूंचा देश आहे” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

मतचोरीबाबत प्रमुख नेते पुढील आंदोलनाची दिशा ठरवतील. आघाडीचे नेते आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, डाव्या पक्षाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित असतील आणि मोर्चाला मार्गदर्शन करतील,” असं अनिल परब म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *