केंद्रसरकारच्या अमृत भारत योजनेतून मुंबईत अनेक स्थानकांची कायापालट होणार.

अमृत भारत योजनेतून उत्तम प्रवासी सुविधा म्हणून काही स्थानकांची निवड……

सविस्तर वृत्त: उत्तम प्रवासी सुविधा देण्यासाठी भारतीय रेल्वेने केंद्राच्या मदतीने अनेक सुखसुविधांचे तसेच प्रवाश्यांसाठी सेवा पुरविण्याचे काम भारतीय रेल्वे कडून करण्यात आले आहे. वाढत्या लोकसंख्येला आणि रेल्वेच्या प्रवाश्यांना येणाऱ्या अडचणीला लक्षात घेऊन केंद्राने अमृत भारत योजनेला सुरुवात केली. ह्या योजनेचा फायदा रेल्वेतून प्रवास करणाऱ्या करोडो लोकांना होणार आहे. ह्या योजने अंतर्गत जी स्थानके अमृत स्थानके म्हणून निवडली जात आहेत त्या स्थानकांवर पुनर्विकासाचे काम सुरु करून त्या स्थानकांमध्ये प्रतीक्षा क्षेत्र, एक्सिलेटर, सौचालयाची सुविधा, आवश्यकतेनुसार लिफ्ट आणि मोफत वायफाय ऑफर करणे, या उपक्रमांमध्ये  एक स्थानक एक वस्तू या उपक्रमांद्वारे उत्पादनांना प्रोत्साह्न मिळण्याबाबत हा उपक्रम राबवण्यात येत आहे .

व्यवसाय बैठकीसाठी जागा नियुक्त करणे त्यासाठी एक्सिक्यूटीव्ह, लौन्सची स्थापना करणे. प्रत्येक स्थानकांमध्ये विशिष्ठ गरजा पूर्ण करणे यात जास्त लक्ष दिले जात आहे. दोन्ही बाजूच्या आसपासच्या शहरीभागांचा एकत्रीकरण करून मल्टीमोडेल कनेक्टीव्हीटीला चालना देणे अपंग तसेच दिव्यांग व्यक्तींसाठी सुखसुविधा प्रधान करणे, वयोवृद्ध तसेच गर्भवती महिलांसाठी सुखसुविधा प्रधान करणे आणि स्थानकांच्या आजूबाजूला पर्यावरण पूरक उपायांच्या अंमलबजावणीवर भर देण्यात आला आहे. या योजनेतील मुंबईतील अनेक स्थानकांचा समावेश आहे. दादर, कांदिवली, दहिसर, पनवेल या चार स्थानकांचा समावेश नव्याने करण्यात आला आहे. तर अंधेरी, बांद्रे टर्मिनल, सीएएमटी, बोरीवली, भायखळा, चर्नीरोड, कांजुरमार्ग ,ग्रांड रोड, कुर्ला एलटीटी मरीनलाइंस, लोअर परेळ, चिंचपोकळी, मालाड, प्रभादेवी, वडाळा, विक्रोळी, विदया विहार या स्थानकांवर अमृत भारत योजना राबविल्या जात आहेत. मुंबईतून आता नवीन चार नावे निवडण्यात आली आहेत. त्यामध्ये पनवेल, दहिसर, दादर, आणि कांदिवली या स्थानकांचा  अमृत भारत योजने मध्ये सहभाग केला आहे. या स्थानकांवरील येणाऱ्या सुखसुविधांचा उपयोग रेल्वेप्रवाश्यांना होणार आहे.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *