बदलापूर मध्ये मोठा जमाव तयार होऊन ठिकठिकाणी उद्रेक झाला……..

सविस्तर वृत्त: बदलापूर मधील एका नामांकित शाळेतील सफाई कामगाराकडून झालेल्या दोन चीमुकलींवर लैंगिक अत्याचाराची माहिती बदलापूर वासियांना कळताच संपूर्ण बदलापूर मध्ये खळबळ उडाली. ही बातमी जेंव्हा मुलींच्या पालकांना कळली तेंव्हा त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली असता पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेण्यास बारा तास लावले. या मध्ये मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी लक्ष घालताच हा गुन्हा नोंदविण्यात आला .

हे सर्व समजताच बदलापूरकरांचा रोष वाढला आणि अख्या बदलापूर मधून बदलापूर बंदची हाक देण्यात आली, आंदोलन कर्त्यांनी बदलापूर रेल्वे स्थानकात येऊन ठिय्या आंदोलन केले. आंदोलन कर्त्यांची मागणी हीच होती कि, “आरोपीला लवकरात लवकर फाशी दया” हे आंदोलन सुमारे चार ते पाच तास चालले. त्यामुळे संपूर्ण रेल्वेसेवा ठप्प झाली. सरकार कडून गिरीश महाजन आणि मंत्री दीपक केसरकर यांनी आंदोलकांशी संवाद साधला असता आंदोलन मागे घ्या पण ह्या मागणीवर आंदोलक तयार नव्हते. त्यांनी या मंत्र्यांसमोर आरोपीला फाशी देण्यात यावी ह्या मागणीवर ते ठाम होते असेच आंदोलन सर्व महिलांनी तसेच सर्व पालकांनी मिळून शाळेतील गेटच्या बाहेर ठिय्या आंदोलन केले आणि शाळेतील पदाधिकारी तसेच तपासक पोलीस ह्यांचा निषेध केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्याचे मुख्यमंत्री यांनी तत्काळ पोलिसांना आदेश दीले की, “दोषीवर कडक कार्यवाही करून हा गुन्हा फास्टट्रक कोर्टात चालवला जाईल”. आणि गुन्हा नोंदवत असताना जे काही पोलीस अधिकारी यात होते त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल तसेच शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना काढून टाकण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला व उच्च अधिकार्यांना दिले. त्यातच राज्याचे गृहमंत्री यांनी ह्या प्रकरणाची निंदा करून पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ आय पी एस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी गठीत करण्याचे आदेश दिले.

कार्यवाहीत विलंब करणारे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच हेड कॉन्स्टेबल यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले. शाळेत लहान मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केले ही खूप निंदनीय आणि मन हेलावून टाकणारी गोष्ट आहे. तात्काळ चार्षिट दाखल करून नराधमाला कुठेही पाठीशी घातले जाणार नाही असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले .
