निवडणूक आयोगाविरुद्ध महाराष्ट्रातील विरोधी पक्ष एकत्र येऊन एक नोव्हेंबरला मोर्चा काढणार

सविस्तर वृत : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मतदार याद्यामधील घोळ झाला असल्याचा आरोप विराधकांनी केला आहे. मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप करत महाविकास आघाडीसह मनसेच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाला घेरले होते. महाविकास आघाडीसह मनसेसह निवडणूक आयोगाला भेट देऊन या घोळाची चौकशी करावी अशी मागणी केली होती. यानंतर याची दखल घेत मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी मतदार याद्यांमधील गोंधळाचा शोध घेण्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना गुरुवारी दिले. आज महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गोरेगाव येथे मेळावा घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. यांनंतर महाविकास आघाडी तसेच मनसेच्या नेत्यांनी आज (रविवार) पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाच्या विरोधात सर्वपक्षीय मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली आहे.
खासदार संजय राऊत यांनी म्हटलं की शिवसेना भवनच्या पाचव्या मजल्यावर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेतात. मात्र, त्यांच्या ऐवजी आज आपण पत्रकार परिषद घेतोय. महाराष्ट्र निर्माण सेनेचा संपूर्ण कॅबिनेट येथे आले आहे. बाळा नांदगावकर म्हणतात मी 24 वर्षांनी आले पानसे म्हणतात 11 वर्षांनी आलोय. गेल्या काही दिवसांपासून आम्ही निवडणूक आयोगा विरोधात लढाई लढतोय. महाराष्ट्राच्या यादीत 96 लाख मतदार अजूनही आमच्या दृष्टीने घुसखोर आहेत. निवडणूक आयोगाच्या मॅच फिक्सिंग विरोधात हा आमचा लढा आहे
या पत्रकार परिेषदेला काँग्रसेचे नेते सचिन सावंत देखील उपस्थित होते, यावेळी त्यांनी मतचोरीचा पुनरुच्चार केला, तेसेच निवडणूक आयागावर टीका केली. ते म्हणाले, विरोधी पक्षांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्य अधिकाऱ्यांची, राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी यांची भेट घेत घेतली होती, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच मात्र विरोधी पक्षाच्या मतांना राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने फार काही किंमत दिलेली दिसत नाही. पुढे ते म्हणाले, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रात जवळपास 41 लाख मतदार वाढले होते, असे राहुल गांधी यांनी याआधीच सांगितलेले आहे. 16 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर या चार दिवसांत महाराष्ट्रात सहा लाख 55 हजार मतदार वाढले, असा दावा सचिन सावंत यांनी केला आहे.
यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नते जयंत पाटील यांनी त्यांचे मत व्यक्त केले. ते म्हणाले, अशी अनेक उदाहरणे आहेत, जी आम्ही लोकांच्या समोर दिलेली नाहीत, आमची अपेक्षा आहे निवडणूक आयोगाने वेळीच त्यांच्या चूका दुरूस्त कराव्यात. निवडणूक आयोगाने आम्ही इतके आक्षेप घेतले, यावर आयोगाने दिलेल्या उत्तरानंतर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. त्याला आयोग उत्तर देईल अशी अपेक्षा आहे. ज्या लोकांचे वय, पत्ते चुकलेले यावर आयोग काय प्रक्रिया राबवणार हे जाहीर करावं. ज्या लोकांची नावे किंवा वय दुरूस्त केले यासाठी काय प्रक्रिया आयोगाने जाहीर करावं. आगामी काळात आम्ही याद्यांमधील इतरही दोष जनतेसमोर मांडणार आहोत. राज्यात ज्या लोकांना लोकशाहीबाबत आस्था आहे त्या लोकांनी लोकशाहीचा पाया भक्कम करण्यासाठी या मोर्चामध्ये सहभागी व्हावे.
संजय राऊत यांनी राज्य निवडणूक आयोग हे सरकारचं गुलाम आहे, त्यामुळे त्यांच्याकडनं फार अपेक्षा नाहीत मात्र विरोधी पक्ष म्हणून आम्हाला आवाज उठवला पाहिजे, असं म्हटलं. मोर्चाचा रूट हे ते सगळे पक्ष मिळून ठरवतील.उद्धव ठाकरे, राज ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ, शरद पवार या सगळ्या नेत्यांशी चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेतला आहे, असं राऊत यांनी सांगितलं
