डोंबिवलीत गणपती सणासद्धी मूर्तिकार अचानक बेपत्ता झाल्यामुळे स्थानिक गणेश भक्तांमध्ये गोंधळाचे वातावरण

सविस्तर वृत : अनेक दिवस गणरायाची आगमनाची आस लागलेल्या गणेश भक्तांचा उत्साह शिगेला पोहचला आहे. बाप्पाच्या स्वागताची तयारी पूर्ण झाली आहे. अवघे काही तास बाप्पाच्या प्रतिष्ठापनेला उरलेले असताना डोंबिवलीमध्ये काही गणेशभक्तांवर ‘विघ्न’ओढवलं आहे. त्यामुळे डोंबिवलीकर सध्या चिंतेत सापडले आहेत.डोंबिवलीतले अनेक गणेशभक्त संकटात सापडलेत आहे, याचे कारण समोर आले आहे. ज्या मूर्तिकाराकडे पैसे देऊन गणेशभक्तांनी मूर्ती बुक केल्या होत्या. तो मूर्तीकार पळून गेला असल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीत घडला आहे..
मंगळवारी सकाळी जेव्हा ही बातमी पसरली, तेव्हा गणेशभक्तांनी महात्मा फुले रोडवरील चिनार मैदानाजवळ असलेल्या कारखान्यात मोठी गर्दी केली. ज्यांना जशी मिळाली, तशी मूर्ती घेऊन काही लोक घरी गेले, तर इतरांना रिकाम्या हाताने परतावे लागले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त तैनात केला असून, ते मूर्तिकार प्रफुल्ल तांबडेचा शोध घेत आहेत
अवघ्या काही तासांत बाप्पाचे आगमन होणार आहे आणि मूर्तिकार जागेवर नसल्याने आता कमी वेळात नवीन मूर्ती मिळणार कुठून आणणार हा विचार करत ग्राहक मिळेल ती मूर्ती या दुकानातून उचलून नेत असल्याचे चित्र दिसतंय. तर अनेक सार्वजनिक मंडळांच्या अपूर्ण आणि न रंगवलेल्या मूर्त्या असल्याने मंडळातील सदस्याची चिंता वाढली आहे
स्थानिक नागरिक आणि गणेशभक्तांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी पोलिसांना लवकरात लवकर मूर्तिकाराचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. एका गणेशभक्ताने सांगितले की, “दीड महिन्यांपूर्वीच आम्ही मूर्ती बुक केली होती आणि त्याचे पैसेही दिले होते. आता ऐनवेळी घरी गणपतीची स्थापना कशी करायची, असा प्रश्न आमच्यासमोर उभा राहिला आहे.”असे स्थानिकांनी पोलिसांना सांगितले आणि पोलिसांनच्या कारभारावर खंत व्यक्त केली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री प्रफुल्ल तांबडे कारखान्याच्या प्रवेशद्वाराजवळ बसून रडत होता आणि “इतक्या ऑर्डर घेतल्या, काम पूर्ण झाले नाही, आता मी काय करू?” असे तो काही लोकांना सांगत होता. यामुळे घाबरून तो पळून गेला असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
