नेपाळमध्ये आंदोलकाने केली आजी-माजी नेत्यांच्या घरावर केले हल्ले आणि जाळपोळ परिस्थिती नियंत्रण बाहेर

सविस्तर वृत : नेपाळमध्ये ‘जनरेशन झेड’ (Gen-Z) तरुणांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आता हिंसक वळण लागले आहे. या आंदोलनादरम्यान माजी पंतप्रधान झलनाथ खनाल यांच्या घरावर हल्ला करून त्याला आग लावण्यात आली. या हल्ल्यात गंभीर भाजलेल्या खनाल यांच्या पत्नी राज्यलक्ष्मी चित्रकार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे आंदोलनातील मृतांची संख्या 19 वर पोहोचली आहे.
दल्लू येथील त्यांच्या निवासस्थानी आंदोलनकर्त्यांनी त्यांना घरातच घेरले आणि आग लावली, अशी माहिती समोर आली आहे. आग लागली तेव्हा राज्यलक्ष्मी चित्रकार आपल्या मुलगा निर्भीक खनाल सोबत घरात होत्या. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना सुरुवातीला कीर्तिपूर येथील बर्न हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यापूर्वी नेपाळी लष्कराने माजी पंतप्रधान झलनाथ खनाल यांना सुरक्षित बाहेर काढले होते.दल्लू येथील त्यांच्या निवासस्थानी आंदोलनकर्त्यांनी त्यांना घरातच घेरले आणि आग लावली, अशी माहिती समोर आली आहे. आग लागली तेव्हा राज्यलक्ष्मी चित्रकार आपल्या मुलगा निर्भीक खनाल सोबत घरात होत्या. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना सुरुवातीला कीर्तिपूर येथील बर्न हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यापूर्वी नेपाळी लष्कराने माजी पंतप्रधान झलनाथ खनाल यांना सुरक्षित बाहेर काढले होते.
सूत्रांनुसार, खनाल यांच्या पत्नी राज्यलक्ष्मी यांना जळालेल्या अवस्थेत कीर्तिपूर बर्न हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे जगात खळबळ माजली आहे. सोमवारपासून सुरू झालेल्या Gen Z आंदोलनाला आता आणखी हिंसक वळण आले आहे. अधिकाऱ्यांकडून या हल्ल्याबाबत अद्याप कोणतेही निवेदन जारी केलेले नाही
दरम्यान, ओली यांच्या लोकप्रियतेत गेल्या काही दिवसांत मोठी घसरण झाली आहे. जनतेत वाढत्या असंतोषामुळे त्यांची राजकीय स्थिती धोक्यात आली असून सरकार कोसळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
नेपाळमधील हे आंदोलन केवळ सोशल मीडिया बंदीपुरते मर्यादित राहिलेले नाही तर लोकशाही व स्वातंत्र्यावरील प्रश्न उपस्थित करणारे ठरत आहे. तसेच भ्रष्टाचारविरोधातही सरकारमध्ये रोष आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून वेगवान आणि ठोस पावले उचलली जात असल्याचे दिसत आहे.
