ठाकरे बंधू गाजवणार येणारा दसरा मेळावा

दसरा मेळाव्यात यावेळी दोन्ही ठाकरें कडून मोठा धमाका ठाकरेंच्या युतीची शक्यता

सविस्तर वृत :मुंबई महापालिकेने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये परवानगी दिली आहे. संजय राऊत यांनी ही माहिती दिली. या मेळाव्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर राज ठाकरे यांची भेट घेतली. पावणे तीन तास चाललेल्या या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकांवर चर्चा झाली असे समजते. या भेटीमुळे शिवसेना आणि मनसे यांच्यातील राजकीय युतीची शक्यता निर्माण झाली आहे. दसरा मेळावा २ ऑक्टोबर रोजी होणार असून त्यात राज ठाकरे उपस्थित राहतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा मेळावा आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्वाचा आहे

मराठीच्या मुद्द्यावरून ते दोघेही एकाच स्टेजवर आले होते. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या घरी भेटायला गेले होते. तिसरी भेट ही गणपतीच्या काळात झाली. राज ठाकरे यांच्या घरच्या गणपतींच्या दर्शनासाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थवर गेले होते.

या तीन भेटीदरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना सविस्तर चर्चा करता आली नसल्याचं दिसून आलं. त्यामुळेच आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचे नेते हे राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर भेटायला गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. या भेटीमध्ये निवडणुकीवरही चर्चा झाल्याची माहिती आहे.

मुंबई, ठाणे, पुणे महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वेगळं समीकरण निर्माण होण्याची शक्यता आहे. या निवडणुका ठाकरे बंधू एकत्र लढवतील. तर, दुसरीकडे मविआतील घटक पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादी शरद पवार गट हे आघाडीत निवडणूक लढवू शकतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील समीकरणे लक्षात घेता ठाकरे बंधू आणि मविआतील इतर पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

या सर्व घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. शिवसेना आणि मनसे यांच्यातील संभाव्य युतीची चर्चा जोर धरत आहे. दसरा मेळाव्यात या युतीबाबत कोणतीही घोषणा होईल का हे पाहणे महत्वाचे आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *