पुण्यातून कोकणात निघालेल्या मित्रांची महिंद्रा थार 500 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात गाडीतील ६ जणांचा मृत्यू

सविस्तर वृत : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटामध्ये एका अपघातामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. पुण्यातून कोकणात निघालेल्या मित्रांची महिंद्रा थार 500 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात गाडीतील ६ जणांचा मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे, 20 दिवसांपूर्वीच ही थार खरेदी करण्यात आली होती. तब्बल २ दिवस त्यांचे मृतदेह हे दरीत पडलेले होते. जेव्हा ड्रोनच्या मदतीने शोध घेतला तेव्हा गाडी आढळली
ताम्हिणी घाटात ही थार गाडी दरीत कोसळल्याचा कोणालाही पत्ता नव्हता. कठडा तुठल्याचे कळल्यानंतर येथे अपघात झाल्याचे स्थानिकांना समजले. या थार कारचा नोंदणी क्रमांक एमएच 14 एचडब्यू 7575 असा आहे. पुण्यातील हे तरुण सोमवारी रात्री थार कारने कोकणात फिरायला निघाले होते. परंतू त्यांच्याशी मोबाईलशी संपर्क होत नसल्याने त्यांच्या शोध सुरु करण्यात आला. रेस्क्यू पथकाने रोपच्या सहाय्याने खाली दरीत उतरुन या तरुणांचे मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर यात सहाही तरुणांचा मृ्त्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्व मृत झालेले तरुण हे 22 ते 25 वर्ष वयोगटातील आहेत.
मृतांचे नावे खालील प्रमाणे आहेत पघातातील सर्व तरुण हे पुणे येथील उत्तमनगर येथील रहिवासी असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. साहील साधू गोटे (24), शिवा अरुण माने (19), ओंकार सुनील कोळी (18), महादेव कोळी (18), प्रथम रावजी चव्हाण (24), पुनीत सुधाकर शेट्टी (20) अशी अपघातातील मृत तरुणांची नावे आहेत.
सोमवारी रात्री उशिरा थार गाडी एका धोकादायक वळणावरून सुमारे 500 फूट खोल दरीत कोसळली. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेने पुण्यासह रायगड जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
ताम्हिणी घाटातील रस्ता अत्यंत वळणावळणाचा आणि दगडांनी भरलेला आहे. प्राथमिक तपासात, रस्त्यावरील वळणाचा अंदाज न आल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटलं असावं, असं दिसून आलं आहे. या दुर्घटनेमुळे घाटातील सुरक्षित वाहनचालनाची गरज अधोरेखित झाली आहेत
