महायुतीचे नेते संजय गायकवाड यांच्या कडून राहुल गांधींवर आक्षेपार्ह विधान वातावरण तापले.

संजय गायकवाड यांच्याकडून राहुल गांधींवर निंदनीय टीका…

सविस्तर वृत्त: कॉंग्रेसचे सर्वेसर्वा आणि केंद्राचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे सध्या बाहेर गावी दौऱ्यावर असल्यामुळे तिकडे त्यांच्या अनेक लोकांसोबत भेटीगाठी सुरु आहेत. त्या भेटीगाठी मध्ये भारताविरुद्ध कटकारस्थान करणाऱ्या किंवा भारताबद्दल अभद्र बोलणाऱ्या लोकांसोबत राहुल गांधींच्या भेटीगाठीचे फोटो समोर आल्यावर भारतामध्ये बीजेपी कडून आणि बीजेपीच्या मित्र पक्षाकडून ट्रोल केले जात आहे. बीजेपी राहुल गांधींना सर्व बाजूंनी ट्रोल करत आहे. त्याचे पडसाद महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये ही दिसून आले.

 शिंदे सरकार मधील संजय गायकवाड यांनी आज राहुल गांधींवर अतिशय निंदनीय टीका केली. संजय गायकवाड यांनी असे भाष्य केले कि, “जो कोणी राहुल गांधीची जीभ छाटून आणेल त्याला मी ११ लाख रुपये देईन.” या व्यक्तव्यावरून कॉंग्रेसमध्ये आणि राज्यातील अनेक नेत्यांमध्ये, जनतेमध्ये संजय गायकवाड विषयी असंतोषाचे वातावरण सुरु झाले आहे. राहुल गांधीवर दिलेल्या ह्या वक्तव्यावर महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते आणि कॉंग्रेसचे नेते विजय वडत्तीवार यांनी संजय गायकवाडांवर आणि महायुती सरकारवर सडकून टीका केली. आणि संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करून राज्यातील कायदा व सुव्यवस्था स्थिती विधारक असून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम या सरकारकडून वारंवार होत आहे, राजकीय सलोखा आणि संसदीय प्रथा, परंपरा, सन्मान ही सर्व धुळीला मिळवण्याचे काम महायुती सरकारने केले आहे. यांना सत्तेचा माज आला आहे.  गायकवाड हे त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त बोलत आहेत आणि वागत आहेत. त्यांना आलेला सत्तेचा माज व मस्ती येणाऱ्या विधान सभेत जनता उतरवेल. असे वडत्तीवार यांनी सांगितले, पुढे ते म्हणाले, “राहुल गांधी हे हुकुमशाही प्रमाणे देश चालवणाऱ्या सरकारला राज्यघटनेप्रमाणे देश चालवण्याचा आग्रह धरीत आहेत.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला राज्यघटनेला धक्का लावण्याचे काम हे नेते करीत आहेत. भाजपला लोकसभा निवडणुकीत पाशवी बहुमतांपासून रोखण्याचे काम जनतेने केले आहे.

लोकसभेचा निर्णय व लोकांच्या येणाऱ्या प्रतिक्रिया ऐकून महायुती सरकारची पायाखालची जमीन सरकली आहे आणि त्यांचे मानसिक संतुलन हि बिघडले आहे, महायुती मधील आपसी वादांमुळे अशी विधाने महायुती मधून नेते विरोधकांवर करत आहेत.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *