वरळी मध्ये आदित्य ठाकरे विरुद्ध राज ठाकरे देणार उमेदवार ..

सविस्तर वृत्त: विधान सभा निवडणुकाजवळ आल्यामुळे सर्व पक्षांमध्ये जागा वाटपावरून खडाजंगी चालू आहे त्यातच उमेदवारीसाठी आमदारांकडून आणि कार्यकर्त्यांकडून अनेक पक्षांत येणे जाणे चालू आहे आणि त्यातच सर्व नेते मंडळींकडून एकमेकांच्या कामकाजावर आणि त्यांच्या मतदार संघातील एकूण परिस्थितीवरून विरोधात बोलणे चालू झाले आहे.
त्यातच वरळी मध्ये आमदार आदित्य ठाकरे हे तेथील स्थानिक आमदार म्हणून कार्यरत आहेत २०१९ मध्ये राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट ठेऊन आदित्य ठाकरे विरुद्ध उमेदवार दिला नाही. त्यामुळे आदित्य ठाकरे हे लीड घेऊन तेथे आमदार झाले. एकूण या मतदार संघात मराठी वर्ग आणि स्थानीक कोळी समाज हा मोठा वर्ग आहे त्यातच हा मराठी माणसांचा गड आहे, उद्धव ठाकरे गट आणि मनसे ह्या दोन्हीही मराठी माणसांच्या हितासाठी लढणारे पक्ष आहेत यातच राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकींना लक्षात घेऊन आधीच जाहीर केले आहे कि, त्यांचा पक्ष विधान सभा निवडणुकीच्या संपूर्ण जागा लढवणार आहेत. त्यातच राज ठाकरेंनी काही जागेवर उमेदवार देण्यास सुरुवात केली आहे.
पुणे, कोकणातील खेड, चिपळूण, कल्याण, डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई अशा जागांचा समावेश आहे आणि राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना वरळीची जागा लढवण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठी उमेदवार म्हणून संदीप देशपांडे किंवा अमित ठाकरे यांचा राज ठाकरेंसमोर आदित्य ठाकरे विरुद्ध पर्याय असू शकतो, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
याचा फायदा राज ठाकरेंना किती होतो हे, येणाऱ्या काळातच मतदान झाल्यावर समजू शकेल. आणि ह्याचा आदित्य ठाकरेंना किती फरक पडतो हे देखिल बघणे वरळीकरांना अपेक्षित असेल राज ठाकरेंच्या ह्या घोषणेमुळे कुटुंब विरुद्ध कुटुंब असे चित्र पहावयास मिळणार आहे.
