नवी मुंबईकरांचे विमानतळाबाबतची प्रतिक्षा संपली आज नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील सर्वात मोठ्या विमानतळाचे उद्घाटन

सविस्तर वृत : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यातही मुंबई महापालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत.मोदींच्या हस्ते आशिया खंडातील सर्वात मोठं विमानतळ म्हणून पाहिलं जात असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी (ता.8) पार पडलं आहे
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन कार्यक्रमाला पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्यासह महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीय मंत्री राम नायडू,मुरलीधर मोहोळ,रामदास आठवले,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह उद्योगपती गौतम अदानी हेही उपस्थित होते
फक्त प्रवासीच नाही, तर NMIA व्यापार आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रासाठीही बळकटी देणारे विमानतळ ठरणार आहे. या विमानतळाची मालवाहतुकीची क्षमता ही दरवर्षी 3.25 MMTA (मिलियन मेट्रिक टन प्रति वर्ष) इतकी आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक करण्याची क्षमता असलेले नवी मुंबई विमानतळ हे आशियातील आणि जगातील काही मोजक्या विमानतळांपैकी एक आहे. या विमानतळावर 3,700 मीटर लांबीच्या दोन समांतर धावपट्ट्या आहेत ज्यामुळे कमी दृश्यमानतेतही सुरक्षित विमान उड्डाण शक्य होईल.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उलवे येथे आहे.हा विमानतळ म्हणजे भारतातील सर्वात मोठा ग्रीनफिल्ड इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रोजेक्ट आहे. यामुळे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरील भार कमी होईल अशी अपेक्षा आहे. अटल सेतू, कोस्टल रोड, मेट्रो विस्तार यामुळे नवी मुंबईपर्यंत प्रवासाचा वेळ कमी झाला आहे
