पुण्यात नाना पेठेत गोळ्या झाडून तरुणांची हत्या

Oplus_131072

पुण्यात अनंत चतुर्थीच्या आधी मोठा गॅंगवॉर  तरुणाचा मृत्यू परिसरात भीतीचे वातावरण पोलिसांनी तातडीने तपासा ची सूत्रे हलवली

सविस्तर वृत: पुण्यातील नाना पेठत परिसरात गँगवॉररची घटना घडली. हल्लेखोरांनी तरुणावर तीन गोळ्या झाडल्या असून त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गोळ्या झाडून खून झालेला तरुण म्हणजे गणेश कोमकरचा मुलगा गोविंद कोमकर असल्याचे स्पष्ट झाले आहे. गणेश कोमकर हा एक वर्षापूर्वी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी होता. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे

अज्ञात हल्लेखोरांनी गोविंद कोमकर याच्यावर अंदाजे तीन गोळ्या झाडल्या. गोळ्या लागल्यामुळे तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. या हत्येमुळे परिसरात तणावपूर्ण आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गोविंदचा वडील गणेश कोमकर हा  वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणातील आरोपी आहे. त्यामुळे, या घटनेचा संबंध जुन्या वैमनस्यातून झाला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *