मुंबईत दरड कोसळून दोन जणांचा मृत्यू

Oplus_131072

विक्रोळीत पावसामुळे दरड कोसळून दोन जणांचा मृत्यू तर कुटुंबातील दोन जण जखमी

सविस्तर वृत्त : विक्रोळीतील पार्कसाईट हा डोंगराळ भाग असून या परिसरात डोंगरावर अनेक घरे आहेत. तर डोंगराळ भागामुळे इथे ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका असतो. अशातच आज पहाटे रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळली. ज्यामध्ये मिश्रा कुटुंबियांचं घर दरडीखाली गाडलं गेलं

विक्रोळीच्या पार्कसाईट परिसरातील जनकल्याण सोसायटीच्या आवारात दरड कोसळून या दुर्घटनेत दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर दोन जण जखमी झाल्याची माहिती मिळतेय. घरावर दरड कोसळल्याने जखमी झालेल्या व्यक्तींवर मुंबईतील घाटकोपरच्या राजावाडी येथे उपचार सुरू आहेत. रात्रीपासून पाऊस सुरू असल्याने मध्यरात्री 1 ते 1.30 च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. ज्या घरावर दरड कोसळली त्या घरातील व्यक्ती झोपले होते. मात्र झोपेतच काळाने घाला घातला. शालू मिश्रा (19 वर्षे) आणि सुरेश मिश्रा ( वय 50) असं मृत वडील-मुलीचे नाव असून आरती मिश्रा आणि ऋतुराज मिश्रा या दोघांवर सध्या उपचार सुरू आहेत. हवामान खात्याने मुंबईला आधीच रेड अलर्ट  दिला आहे तसेच प्रशासनाने ही नागरिकांना सतर्क राहण्याचे संदेश दिले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *