कलकत्ता बलात्कार प्रकरण ममता बॅनर्जींना भोवणार

आर जी कर रुग्णालयात झालेल्या बलात्कार प्रकरणी कलकत्त्याच्या मुख्यमंत्री प्रचंड दबावाखाली………

सविस्तर वृत्त: कलकत्ता येथील आर जी कर रुग्णालयातील शिकाऊ महिला डॉक्टर सोबत झालेल्या विकृत कृत्याबद्दल आणि हत्येच्या प्रकरणात ममता बॅनर्जी सर्व स्थरांकडून प्रचंड दबावाखाली असल्याचे दिसून आले.  ह्या प्रकरणाला घेऊन ममता बॅनर्जी यांना पहिल्यांदाच रस्त्यावर उतरावे लागले. आणि ह्या प्रकरणावर त्यांना अनेक प्रकारची विधाने करावी लागली. ह्या वागणुकीवरून ममता बॅनर्जी प्रचंड दबावाखाली आहेत अश्या चर्चा राजकीय वर्तुळात बोलले जाते. ममतादेवींना आपल्या साम्राज्यातील मते विखुरण्याची धास्ती वाटत आहे. सलग तिसऱ्यांदा असणाऱ्या आपल्या कार्यकाळात पहिल्यांदाच अश्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. आरोपीला फाशी व्हावी यासाठी ममता बॅनर्जी ह्या रस्त्यावर उतरल्या त्यामुळे ह्या चर्चांना अजून बळ मिळाले. ममतादेवी ह्या आधी कलकत्त्यामधील कोणत्याही घटनेच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरल्या नाहीत. निवडणुका जवळ आल्या वर आणि एनआरसी आणि सीएए या कायदयांसारख्या मोठया आंदोलनांवर ममता बॅनर्जी या आधी रस्त्यावर उतरताना दिसल्या आहेत.

या घटनेमुळे पोलीस आणि सरकारच्या कृत्याबद्दल, भूमिकेवर प्रश्न चिन्ह उपस्थित झाला आहे. ह्या घटनेच्या  निषेधार्थ एकत्र येण्यासाठी रिक्लेम द नाईट यांनी जे आव्हाहन केले होते त्यानुसार जवळपास ३०० ते ५०० महिला स्वयंकृतपणे एकत्र जमल्या त्या नंतर ह्या घटनेचा लोकांनी संताप व्यक्त करून आंदोलनाला सुरुवात केली. राजकीय विश्लेषकांच्या मते कलकत्त्यामध्ये निवडणुका नाहीत मात्र विरोधकांनी हे प्रकरण धरून ठेऊन विधानसभा निवडणुकीपर्यंत हे प्रकरण जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतील.ममता सरकारवर चारही बाजूंनी विरोधकांची हल्लाबोल चालु आहे त्यात कॉंग्रेस सुद्धा ममतांच्या विरोधात बोलत आहेत. ममता बॅनर्जी यांनी आपल्या पक्षातील सर्व नेत्यांना घेऊन कलकत्त्यातील मौलाली ते धर्मतल्ला अशी जवळजवळ दीड किमी पदयात्रा आपल्या सर्व नेत्यांना घेऊन काढली. पदयात्रेत ममताजींचे सर्व नेतेमंडळी उपस्थित राहून पदयात्रे दरम्यान घोषणाबाजी करत होते. दोषींना शिक्षा देण्यात यावी आणि त्यांना फासावर लटकवण्यात यावे अशा घोषणा पदयात्रे दरम्यान दिल्या जात होत्या. काहींच्या गळ्यात ह्या मागण्यांचे  फलक तर हाती पोस्टर होते ममता बॅनर्जी ह्या यात्रेचे नेतृत्व हात जोडून करत होत्या. चालताचालता त्या लोकांशी संवाद ही साधत होत्या. ह्या पदयात्रे दरम्यान ममताजींच्या स्वभावात बदल आणि चेहऱ्यावरच्या हावभावावरून आत्मविश्वासाऐवाजी काळजी स्पष्टपणे दिसत होती .

ह्या प्रकरणावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला नसता तर त्यांना रस्त्यावर उतरावे लागले नसते. विशेषतः ह्या घटनेशी निघाडीत असलेल्या प्राचार्याचा बचाव कारणे त्यांच्या राजीनाम्याऐवजी त्यांना दुसरीकडे नवीन जागी बदली देणे हे ममता बनर्जींच्या अंगलट येऊ शकते.विरोधकांना ह्या सर्व घटनेतून ममता बॅनर्जी यांनी विरोधासाठी आयता मुद्दा मिळवून दिला आहे असे राजकीय वर्तुळात चर्च आहे. सरकारने सुरवातीला जशी ह्या घटनेबद्दल सक्रियता दाखवायला हवी होती तशी दाखवली गेली नाही. सीबीआय च्या तपासावर कलकत्त्यामधील लोकांचे आणि विरोधकांचे प्रश्न चिन्ह आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *