मालवण मधील शिवाजींचा पुतळा बनवणारा मूर्तिकार पोलिसांच्या ताब्यात…

सविस्तर वृत्त: महाराष्ट्र राज्याला काळिमा फासणारी घटना ही मालवण मध्ये घडली मालवण मधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अचानक कोसळला त्यामुळे महाराष्ट्रात असंतोषाचे वातावरण पसरले आहे. विरोधकांनी सरकारवर घणाघाती आरोप करणे सुरूच ठवले आहे. या प्रसंगावरून स्त्त्ताधारी पक्षाकडून आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कडून माफी देखील मागण्यात आली. तरीही विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करतच आहेत. मूर्ती बनवणाऱ्या मूर्तीकारावर अनेक राज्यकर्त्यांनी तसेच अनेक मूर्तिकारांनी मूर्ती बनवण्याच्या आणि त्याच्या कामकाजावर आक्षेप घेतला आहे, कारण अवघ्या आठ महिन्यातच पुतळा उभा राहतो ना राहतोच तर तो कोसळला. त्यामुळे मोठ्या वादाला सुरुवात झाली आहे. मालवण येथील शिवाजींचा पुतळा बनवण्यासाठी जयदीप आपटे या मूर्तिकाराला प्रशासनाकडून नेमण्यात आले होते. मूर्तिकार जयदीप आपटे यांनी जे घाई गडबडीत शिल्प बनवले ते शिल्प कोणत्याही बाजूने छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे हे दिसून येत नव्हते, असे राजकीय वर्तुळात आणि अनेक मुर्तीकारांचे आणि तज्ञांचे मत होते. जयदीप आपटे हा नवखा मूर्तिकार असून त्याला हे काम कसे देण्यात आले? यावर कोणत्या राजकीय नेत्याचे वज्रहस्त आहे? हे वारंवार विरोधकांकडून सांगितले जात आहे. यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे ही विरोधकांकडून बोलले जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर जयदीप आपटे हा आपल्या राहत्या घरातून कल्याण मधून गायब झाला. पुतळा पडल्यानंतर जयदीप आपटे वर गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यावर जयदीप आपटेला पोलीसांनी शोधण्यास सुरुवात केली. पण जयदीप आपटे पोलिसांना कुठे ही सापडला नाही. पोलिसांनी मूर्तिकार जयदीप अपटेच्या सर्व नातेवाईकांकडे विचारणा केली असता जयदीप आपटे कुठेही पोलिसांच्या हाती लागला नाही. त्यामुळे पोलिसांकडून लुक ऑउट नोटीस जारी करण्यात आली. आणि जयदीप आपटे हा ११ दिवसांनंतर रात्रीच्या सुमारास अचानक पोलिसांच्या हाती लागला, जयदीप आपटेला पकडण्यासाठी पोलिसांनी अनेक तुकड्या नेमून त्याचा तपास करण्यास सुरुवात केली होती. पोलीस कल्याण मध्ये जयदीप अपटेच्या घराबाहेर साध्या पोशाकात नजर ठेवून होते. जयदीप आपटे हा रात्रीच्या सुमारास डोक्यात टोपी, तोंडाला रुमाल बांधून संशयास्पदरित्या घराकडे येताना पोलिसांना दिसला. पोलिसांनी जयदीप अपटेला त्याच्या घराबहेच पकडल्यानंतर त्याची विचारपूस केल्यानंतर पोलिसांना हा जयदीप आपटे आहे हे समजले. जयदीप अपटेला विचारणा केली असता तो आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी आला असल्याचे तपासात माहिती पडले. जयदीप आपटे हा पोलिसांना विनवणी करत होता कि, “मला माझ्या घरच्यांना भेटू दया” पण पोलिसांनी त्याचे म्हणणे न ऐकता त्याला घराबाहेरच पकडले. या सर्व गोंधळात इमारतीमधील लोकं आणि जयदीप आपटेच्या परिवारातील सदस्य त्याच्या जवळ आले. पण पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता तिकडून त्याला डीसीबी (dcb) स्कॉड मध्ये नेले आणि तिकडून त्याचा ताबा सिंधुदुर्ग पोलिसांना देण्यात आला जयदीप आपटेचा ताबा घेतल्यानंतर सिंधुदुर्ग पोलीस त्याला कोर्टात हजर करण्यासाठी मालवण मध्ये घेवून आले. पुढे कोर्टाचा निर्णय काय होईल, हे बघणे अपेक्षित आहे..!
