दहिसर ते मिरा-भाईंदर पश्चिम पर्यंत मेट्रो धावणार.

मुंबई मधील मिरा-भाईंदर वासियांसाठी खुश खबर…………..

सविस्तर वृत्त:  लवकरच एमएमआरडीए कडून दहिसर ते मिरा- भाईंदर पश्चिमचा मार्ग सुरु करण्यात येणार आहे. या मार्गामुळे मिरा-भाईंदर वासियांचा ट्राफिकचा प्रश्न काही प्रमाणात सुटेल. याचा फायदा दहिसर आणि मिरा-भाईंदर वासियांना होणार आहे. त्याच प्रमाणे वेळेची ही बचतहोणार आहे. दहिसर चेकनाका ते सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत मेट्रो – ९ ची सेवा लवकरच सुरु होणार आहे. सध्या ह्या मेट्रोचे काम ८७% पूर्ण झाल्याची माहिती एमएमआरडीए ने दिली आहे .

२०१९ मध्ये मेट्रो-९ चा टेंडर जारी करण्यात आला होता. त्यानंतर हा प्रकल्प २०२२ पर्यंत संपवण्यात सांगण्यात आले होते.पण मध्ये कोविड मुळे ह्या कामाला स्तगिती मिळाली. आणि हे काम पुढे ढकलण्यात आले. दहिसर ते मिरा-भाईंदर पश्चिम पर्यंतचा मार्ग १०.४१ कि मी असणार आहे, या मार्गावर ८ मेट्रो स्टेशन असणार आहेत. सततच्या वाहतुकीच्या कोंडीमुळे मेट्रोब्रीज खाली हाटकेश ते गोल्डन नेस्ट सर्कल पर्यंत तीन फ्लायओवर तयार करण्यात येणार आहेत.

या मेट्रोला रुळावर आणण्यासाठी दोन भागात विभाजन होणार आहे. पहिल्या टप्प्यात डिसेंबर २४ मध्ये दहिसर ते काशिगाव पर्यंत, तर दुसरा टप्पा डिसेंबर २०२५ दहिसर ते सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत (भाईंदर पश्चिम) असा सुरु होईल. मेट्रोचे हे ८ स्थानक अशा प्रकारे असतील, १.दहिसर, २. पांडुरंग वाडी , ३. मिरगाव, ४. काशिगाव, ५.साईबाबा नगर, ६. मेडेतिया नगर, ७. शहीद भगतसिंग उद्यान, ९. सुभाषचंद्र बोस ( भाईंदर पश्चिम). मेट्रो – ९ च्या कारशेड चे काम भाईंदर पश्चिम येथील राईगावात होणार होते, मात्र स्थानिक लोकांच्या प्रखर विरोधांमुळे ही कारशेड उत्तन येथे डोंगरी गावामध्ये स्थलांतरीत करण्यात आली आहे. आता मेट्रो – ९ चे काम  सुभाषचंद्र बोस ते डोंगरी पर्यंत धावेल. आता यापुढे राईमोरवा, मुर्धा गावातील लोकांना या योजनेचा लाभ मिळेल की, नाही या तिसऱ्या टप्प्याचे काम सुरु होईल कि नाही ? ह्या साठी तेथील स्थानिक लोकांना वाट पहावी लागणार आहे .

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *