भाजपात विधानसभा निवडणुकीपूर्वी हरियाणामध्ये राजीनामा सत्र सुरु…
सविस्तर वृत्त: हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यावर सर्व राजकीय पक्षांमध्ये इन ऑउट राजकारण चालू आहे. हरियाणातील अनेक नेते तिकीट मिळवण्यासाठी आणि आपली राजकीय कारकीर्द पूर्ववत ठेवण्यासाठी इतर पक्षांत उड्या मारत आहेत. राजकीय पक्षांनी आपापल्या विधानसभेसाठी सदस्यांची निवड जाहीर केली आहे. ही निवड जाहीर होताच कॉंग्रेस आणि भाजपात राजीनामे सत्र चालू झाले आहेत. यातच भाजपाकडून आता पर्यंत ७० हून जास्त नेत्यांनी राजीनामे देले आहेत याचे कारण त्यांना विधानसभेत तिकीट न मिळाल्यामुळे सांगण्यात येत आहे राजीनामे दिलेले हे नेते भाजपच्या नेत्यांवर आणि केंद्रातील नेत्यांवर नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपकडून वेगवेगळ्या स्थरावरून समजूत काढण्याचे सत्र सुरु केले आहे.
भाजपात नेत्यांनी राजीनामे दिल्यानंतर दिल्लीतही आता सूत्र हलू लागले आहेत दिल्लीत सावित्री जिंदल आणि माजी मंत्री कर्णदेव कंबोज यांना दिल्लीत बोलवले आहे. त्यांच्या सोबत भाजपचे दिल्लीतील वरिष्ठ नेते काय चर्चा करतील हे पाहणे अपेक्षित आहे. चर्चा संपल्यावर हे दोघे ही रविवारी हिसारला परतण्याची शक्यता आहे. सावित्री जिंदल ह्यांचे समर्थक पुढील आदेशाची वाट पाहत आहेत. हरियाणाचे मुख्यमंत्री नायाबसिंह सैनी यांनी राज्य कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर हे स्पष्ट केले कि, कोणाचेही तिकीट बदलले जाणार नाही. हे नाराजीचे सूर भाजपातच नाही तर कॉंग्रेस मध्ये देखील उमटले आहेत. कॉंग्रेसचे कार्यकर्ते थेट हिसारहून दिल्लीला पोहचले आहेत. आणि त्यांनी राज्याचे प्रभारी दीपक बाबारीया यांच्या गाडीसामोरच घोषणा बाजीला सुरुवात केली. माजी आमदार घोडेला आणि सेलवल यांच्या वर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यामुळे त्यांचे तिकीट नाकारण्यात यावे अशी मागणी कार्यकर्ते करत आहेत. कॉंग्रेस नेते राजेश जून यांनी ११ सप्टेंबर पर्यंतचा कॉंग्रेसला त्यांच्या तिकीटासंदर्भात अल्ट्टीमेटम दिला आहे. त्यानंतर ते बहाद्दूर गडामधून तिकीट न मिळाल्यास अपक्ष उमेदवार म्हणून लढण्याची तयारी ठेवू असा इशारा कॉंग्रेसला दिला आहे. हरियाणामध्ये या राजकीय घडामोडींमुळे हरीयाणाचे राजकारण तापलेले दिसून येत आहे, येणाऱ्या विधान सभेत कोणाची तख्ता पालट होते भविष्यात हे पाहणे जरुरी असेल…!
