म्हाडाच्या घरांची लॉटरी ८ ऑक्टोबर ला निघणार …

सविस्तर वृत्त: मुंबईत म्हाडाच्या वतीने अख्या मुंबई भर इमारती बांधल्या जातात .त्या इमारती बांधण्यापूर्वीच म्हाडा लोकांकडून अर्ज आणि अनामत रक्कम घेते. आणि नंतर काही कालावधी नंतर त्याची सोडत काढली जाते, त्या सोडती मध्ये ज्या कोणी व्यक्तीला ते घर सोडतीमध्ये लाभ मिळेल त्याला म्हाडा कडून संपूर्ण नियमांचे पालन करून हप्त्या-हप्त्याने पैसे भरून म्हाडा त्या व्यक्तीला संपूर्ण रक्कम मिळाल्यानंतर त्याला त्याचे घर नावावर करते. अशीच सोडत आता म्हाडाने २०२४ मध्ये २०३० घरांच्या सोडतीसाठी १९ सप्टेंबर रोजी दुपारी बारा पर्यंत अर्जाची अंतिम मुदत दिली असून रात्री बारा पर्यंत अनामत रकमेचा भरणा करण्यात येणार आहे.
३७० घरांच्या किंमती या म्हाडाकडून १०% ते २५% ने कमी करण्यात आल्यामुळे अनेकांच्या आश्या पल्लवित झाल्या आहेत. या लॉटरीसाठी ९ ऑगस्ट रोजी अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती आणि १९ सप्टेंबर रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेत neft किंवा rtgs या मार्गाने बँकेत अनामत रक्कम भरता येणार आहे, अशी मुदत म्हाडा कडून ग्राहकांना देण्यात आली आहे. २९ सप्टेंबर रोजी दुपारी बारा पर्यंत प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ओनलाईन दावे, हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता स्वीकृत अर्जाची अंतिम यादी http://housingmhada.gov.in या वेबसाईट वर सायं ६ वाजता प्रसिद्ध होईल.
म्हाडाच्या या प्रकल्पामुळे अनेक गरजू व्यक्तींना आपल्या स्वतःचे घर मुंबईमध्ये घेता येणार आहे. म्हाडाकडून नेहमी प्रमाणे घरांच्या किमती बाजार भावापेक्षा कमी दरात विक्री करून लोकांना उपलब्ध करून दिली जातात.
