बीजेपीकडून विधान सभेच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात मोठ्या नेत्यांना जबाबदारी दिली जाण्याची शक्यता…

सविस्तर वृत्त: महाराष्ट्र विधान सभा निवडणुका काही कारणास्तव निवडणूक आयोगाकडून पुढे ढकलण्यात आल्या आहेत आणि एकंदरीत महाराष्ट्राचे वातावरण पाहता महायुती सरकारकडून निवडनुकासमोर ठेवून अनेक उपक्रम, योजना महाराष्ट्रातील नागरिकांना देण्यात येत आहेत. तसेच महाविकास आघाडीकडून देखील सरकारच्या प्रत्येक योजना तसेच कामकाजावरील भ्रष्टाचारावरून व वाढत्या महागाई, गुन्हेगारी याबद्दल सरकारवर आरोप चालू ठेवले आहे. निवडणुकीला लक्षात घेवून दोन्ही म्हणजेच महाविकास आघाडी आणि महायुतीकडून निवडनुकीसदर्भात कंबर कसली जात आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर बीजेपी मध्ये मोठी खलबत पाहण्यास मिळाली बीजेपीतील काही मोठ्या नेत्यांना सुद्धा लोकसभेत हार पत्करावी लागली. बीजेपीला लोकसभेत सर्वात जास्त फटका हा महाराष्ट्रामध्ये लागला.
महाराष्ट्रात आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर आपली स्वपक्षाची पकड मजबूत करण्यासाठी केंद्रातून प्रमुख पाऊले उचलली जात आहेत. महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पूर्व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या सोबत केंद्रीय मंत्री (रस्ते व वाहतूक) नितीन गडकरी यांचे नाव सुचविण्यात आले आहे. नितीन गडकरी हे केंद्रामध्ये एक प्रमुख व्यक्तिमत्त्व आहे. नितीन गडकरी यांचा केंद्रात आणि महाराष्ट्रात एक स्पष्टवक्ता आणि स्वछ प्रतिमा असलेला मंत्री म्हणून ओळख आहे. नितीन गडकरी यांनी रस्ते व वाहतूक खाते केंद्राकडून आल्यापासून संपूर्ण भारतात आपल्या खात्याकडून चांगली कामगिरी केली आहे. तसेच त्यांनी महाराष्ट्रातील कामांवर ही विशेष लक्ष दिले आहे. नितीन गडकरी हे महाराष्ट्रात आधी कबिनेट मंत्री आणि बीजेपी चे प्रदेशाध्यक्ष होते. त्यानंतर ते राष्ट्रीय अध्यक्ष ही झाले २०१४ लोकसभा निवडणुकीत ते केंद्रीय मंत्री बनले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र राज्यात लक्ष देणे कमी केले आणि केंद्रामध्ये जावून केंद्राकडून मिळालेल्या खात्यात आपले लक्ष केंद्रीत केले, असे सांगितले जात आहे की, “केंद्रातून गडकरींना विधानसभा निवडणुकीसाठी सक्रीय केले जात आहे” त्या मुळेच त्यांना प्रचार आणि प्रसाराची जबाबदारी सोपवण्यात येत आहे. महाराष्ट्रात बीजेपीला लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त तोटा विदर्भामध्ये झाला. लोकसभेच्या १० जागांपैकी ७ महाविकास आघाडीने तर शिंदेंच्या शिवसेनेला १ जागा आणि बीजेपीच्या खात्यात २ जागा मिळाल्या. लोकसभेची ही अवस्था बीजेपी साठी पुन्हा होवू नये म्हणून बीजेपी कडून आता पासूनच नवीन-नवीन रणनीती आखण्यास सुरवात झाली आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे जुने जाणते नेते असल्यामुळे तसेच त्यांचे महाराष्ट्रातील वर्चस्व आणि इतर नेत्यांजवळ असलेले संबंध याचा फायदा बीजेपी ला विधानसभा निवडणुकीत नक्कीच होईल. म्हणून केंद्रातून नितीन गडकरी यांचे नाव महाराष्ट्र प्रचार आणि प्रसारासाठी केले गेले आहे. या रणनीतीचा फायदा बीजेपी ला येत्या निवडणुकीत कितपत होतो, हे पाहणे अपेक्षित आहे …!
