मुंबई मेट्रो आता सणासुदी निमित्त मध्यरात्री पर्यंत धावणार…

सविस्तर वृत्त: मुंबई मध्ये अनेक सण साजरे केले जातात. पण संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त कोकण, मुंबई, तसेच पुणे या भागात गणेश उत्सव हा सण मोठ्या थाटा माटात साजरा केला जातो. ह्या काळात मुंबई, पुण्यामध्ये मानाचे गणपती आणि इतर मोठे सार्वजनीक गणपती मंडळे आणि मोठमोठाल्या गणेश मूर्ती मुंबईमध्ये पाहण्यासाठी मिळतात. त्यात मुंबईचा राजा, लालबागचा राजा, चिंचपोकळीचा राजा, मांटूग्याचा राजा, सिद्धिविनायक गणपती, गिरगावचा राजा अशी अनेक मोठ-मोठी मंडळे आणि त्यांच्या गणेश मुर्त्या पाहण्यासाठी अनेक व्हीआयपी कलावंत, नेते मंडळी, मोठ-मोठे व्यापारी यांस सोबत मुंबईतील सामान्य जनता यांची गर्दी पाहावयास मिळते. यासाठी आपल्या घरगुती गणपतीचे विसर्जन झाल्यावर लोकं अख्या मुंबईभर गणपती पाहण्यासाठी आपल्या परिवारासोबत बाहेर निघतात. आणि गणपती दर्शनासाठी लांबचलांब रांगांमध्ये उभे राहून गणपतीचे दर्शन घेत असतात. यासाठी आता मेट्रो (एमएमआरडीए) कडून गणेश उत्सवादरम्यान वाढीव फेऱ्या चालवण्याचा मुख्यमंत्री आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष यांनी घेतला आहे. महामुंबई मेट्रोचे अध्यक्ष डॉ. संजय मुखर्जी यांनी घोषणा केली कि, वाढीव फेऱ्यांच्या मागणीची पूर्तता आणि परिवहन सेवा वाढवण्यावर भर दिला जाईल. गणेश उत्सवादरम्यान अनेक भक्त प्रवास करत असतात आणि त्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. हे लक्षात घेता ११ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत अंधेरी पश्चिम आणि गुंदवली या दोन्ही टर्मिनल्स वरून शेवटची मेट्रो ११ ऐवजी ११:३० वाजता सुटेल. त्यामुळे गणेश भक्तांना आपापल्या घरी जाण्यासाठी मेट्रोचा वापर करून लवकर जाता येईल. हा मूळ उद्देश आहे, असे महामुंबई मेट्रो ऑपरेशनचे अध्यक्ष आणि मुं म प्र वि प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी माध्यमांशी सांगताना म्हणाले, या उत्सव कालावधीत गणेश भक्तांना आणि नागरिकांना अखंडित वाहतूक सुविधा पुरविणे ही आमची जबाबदारी आहे मेट्रो हा प्रवासासाठी सुविधा जनक पर्याय म्हणून नागरिकांसाठी उपलब्ध असेल.
आम्ही नेहमीच आमच्या प्रवाश्यांच्या गरजांना प्राधान्य दिले आहे. वाढीव फेऱ्यांमुळे गर्दी विभागली जाण्यास मदत होईल. त्यामुळे उत्सवाच्या काळात घरी परतण्याचा प्रवास सुरक्षित व आरामदायी असेल. अंधेरी पश्चिम आणि गुंदवली मेट्रोची वेळ ३० मिनिटे वाढवण्यात येणार आहे. दोन्ही टर्मिनल्स वरून अतिरिक्त मेट्रो रात्री ११:१५ पासून ११:३० पर्यंत सुटतील “गुंदवली ते दहिसर पूर्व आणि अंधेरी पश्चिम ते दहिसर पूर्व” या स्थानकादरम्यान ४ वाढीव फेऱ्या सुरु करण्यात येतील. उत्तम दर्जाच्या सेवा देण्यासाठी मुंबई मेट्रो ही नेहमीच कटीबद्ध असते. अतिरिक्त फेऱ्यांमुळे गणेश उत्सवादरम्यान नागरिक आणि गणेश भक्तांना आपापल्या घरी वेळेवर पोहचून वाहतूक कोंडीपासून त्यांचा बचाव होणार आहे आणि मुंबईतील ट्रान्सपोर्टचा ताण देखील कमी होईल. म्हणून सणासुदीच्या काळात मेट्रोने हा निर्णय घेतल्यामुळे प्रवाश्यांना ह्याचा फायदा होणार आहे.
