एअर इंडियाची ताकद वाढणार.

विलीनिकरणामुळे एअर इंडियाची ताकद वाढणार.

सविस्तर वृत्त: एअर इंडियाकडून कमी तिकीट दरात प्रवाश्यांना सेवा पुरवली जाते. आणि कमी तिकीट भाड्यामुळे विमानामध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांची संख्या जास्त असते. पण आता विमान प्रवासी वाहतूक क्षेत्रातील विस्तारा ह्या कंपनीचे एअर इंडिया मध्ये विलीनीकरण प्रक्रिया सुरु होणार आहे, या प्रक्रियेमुळे संपूर्ण विस्तारा कंपनी एअर इंडियात समाविष्ट होणार आहे. विलीनीकरणाची प्रक्रिया ही १२ नोव्हेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर विस्ताराचे कर्मचारी व विमाने सर्व गोष्टी एअर इंडियाकडे वर्ग होतील विस्तारा ही कंपनी उच्च दर्जाच्या सेवेसाठी ओळखली जाते.

विस्ताराच्या सेवेचा दर्जा कोरोना काळातील संकट वगळता संम्पूर्ण कालावधीत चांगला राहिला आहे प्रवाश्यांची भोजनसेवा आणि विमानीसेवा या गोष्टींसाठी प्रवाश्यांची पसंती विस्ताराला अधिक असते. विस्ताराने ९ जानेवारी २०१५ रोजी सेवेला सुरुवात केली होती. सध्या कंपनीकडे ७० विमाने आहेत हवाई वाहतूक महासंचालनाच्या आकडेवारी नुसार कंपनीचा देशांतर्गत हवाई वाहतूक बाजार पेठेत १०% आणि अंतराष्ट्रीय हवाई वाहतूक बाजार पेठेत ४.१% इतका हिस्सा आहे विलीनीकरणाच्या घोषणेनंतर ग्राहकांना ३ सप्टेंबर ते ११ नोव्हेंबर या कालावधी पर्यंतची तिकिटे विस्ताराची खरेदी करता येतील कारण ११ नोव्हेंबर नंतर विस्ताराची विमाने एअर इंडिया मध्ये समाविष्ट होतील १२ नोव्हेंबर अथवा त्यानंतरची तिकिटे आधीच ग्राहकाने खरेदी केली असतील तर एअर इंडियाकडून त्यांना नवीन तिकिटे आपोआप मिळतील याबाबत कंपनीकडून ग्राहकांना स्वतंत्रपणे कळवण्यात येईल. ११ नोव्हेंबर नंतर विस्ताराऐवजी एअर इंडियाच्या मंच्यावरून विमानाची तिकिटे खरेदी करावी लागतील. भारतात विमान तिकिटांचा दर जास्त असल्याने प्रवासी आधीच सवलतीत तिकिटे खरेदी करतात. दिवाळी काळातील तिकिटे खरेदी केलेल्या ग्राहकाने विलीनीकरण प्रक्रिया दिवाळी नंतर पूर्ण झाल्यावर मोठा गोंधळ ठरणार आहे असे सांगण्यात येत आहे. विस्ताराचा लॉयल्टी प्रोग्राम ही एअर इंडियाच्या फ्लाईंग रिटर्न ह्या कार्यक्रमात विलीन केले जाईल. यामध्ये विस्ताराच्या ग्राहकांना कोणताही तोटा होणार नाही. कोणत्याही अडथळ्याविना एअर इंडियाचे पॉइंट मिळवू शकतील आणि त्यांचा वापर करू शकतील. विस्ताराच्या प्रवाश्यांना विमानतळावर मिळणारी लाउन्जची सुविधा ११ नोव्हेंबर पर्यंत कायम राहील लाउन्ज सुविधा घेतलेल्या विस्ताराच्या प्रवाश्यांना पैसे परत मिळतील.

विस्ताराचा को ब्रांडेड क्रेडीट कार्ड विलीनिकरणानंतर ही वैध्य राहील त्याचे फायदे आणि रीवोर्ड यात बदल होवू शकते अश्या कार्ड धारकाने संबंधित बँकेशी संपर्क साधून त्यातील नेमके बदल जाणून घ्यावे, विस्तारा मध्ये टाटा सन्स आणि सिंगापूर एअर लाईन्स यांची ५१.४९ एवढी हीस्सेदारी आहे सिंगापूर एअर लाईन्सला थेट परकीय गुंतवणुकीला केंद्राकडून मंजुरी दिली गेली आहे, या नंतर लगेच विलीनीकरणाची घोषणा दिली गेली आहे. एअर इंडिया मध्ये सिंगापूर एअर लाईन्सचा २५.१% हिस्सा असेल. या विलीनीकरणाची प्रक्रिया सुद्धा १२ नोव्हेंबर पर्यंत पार पाडली  जाणार आहे. या विलीनीकरणात विना अडथळा पूर्ण करण्याची पाऊले दोन्ही कंपन्यांनी उचलली आहेत. विस्ताराच्या विमानांचे नियोजन वेळापत्रक आणि त्यातील नियुक्त कर्मचारी या मध्ये येत्या वर्षात बदल केले जाणार नाही. विमान प्रवासी वाहतूक क्षेत्रात विस्तारा कंपनीचे सर्विस एअर इंडिया पेक्षा उच्च दर्जाची आहे. हा उच्च दर्जा विलीनिकरणानंतर एअर इंडिया गाठणार का? किंवा सेवेची पातळी राखणार का? असाही हवाई वाहतूक क्षेत्रात प्रश्न चिन्ह उभा राहिला आहे.

एअर इंडियाकडून कमी तिकीट दरात प्रवाश्यांना सेवा दिली जाते त्यामुळे एअर इंडियाचा दर्जा विस्ताराशी मिळता जुळता नसल्याचे अनेक प्रवाश्यांचे मत आहे, एअर इंडियाचा देशांतर्गत १४.२% तर अंतराष्ट्रीय वाहतूक बाजार पेठेत १३.१% येवढा हिस्सा आता सध्या आहे. ह्या विलीनीकरणानंतर वाहतूक बाजार पेठेत एअर इंडिया कंपनीच्या हिश्यामध्ये लक्षणीय वाढ होणार असून स्थानात देखील बदल होणार आहेत. या विलीनिकरणानंतर विस्तारासारखे सेवा एअर इंडिया कडून बघायला मिळेल कि नाही? हे प्रवाश्यांसाठी अपेक्षित  राहणार आहे..!

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *