गूगल, आधार, युपीआय पेमेंटचे नियम बदलणार…

सविस्तर वृत्त: केंद्राकडून आणि आरबीआय कडून सतत ऑनलाईन पेमेंटला घेऊन नवीन नविन गाईड लाईन येत असतात अशातच येणाऱ्या दोन दिवसांत म्हणजेच १ सप्टेंबर पासून ऑनलाईन पेमेंट आणि एन्डरॉईड गूगल पे ॲपला घेऊन नवीन नियम, अटी लागणार आहेत. आधार कार्ड आणि गूगल बदलत असल्यामुळे याचा थेट परिणाम मोबाईल युझर्सना होणार आहे अशा वेळी ह्या बदलांची माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे. त्या मुळे तुम्ही तुमची कामे वेळेआधी पूर्ण करू शकाल. गुगल पे स्टोअर पॉलिसी, युआयडीआय, एनपीसीआय आणि ट्रायच्या नियमांमध्ये बदल करण्यात येट आहेत. आपल्याला येणारे स्पॅम कॉल आणि संदेश रोकण्यासाठी दूर संचार कंपन्यांना ३० ऑगस्टची शेवटची मुदत देण्यात आली आहे.
जर तुम्ही युपीआय सेवेचा वापर करत असाल तर १ सप्टेंबर २०२४ पासून काही नियम व अटी शर्तींचे पालन तुम्हाला करावे लागणार आहे. गुगल आपल्या प्लॅटफॉर्म वरून काही ॲप हाटवणार आहे. त्यासाठी गुगलचे नवे प्लेस्टोअर सप्टेंबर पासून लागू होत आहे. गूगल ने म्हटले आहे कि, ,गूगल प्लेस्टोअर वरून १००० ॲप हटवणार आहेत गुगलला ह्या ॲप संदर्भात काही संशयास्पद माहिती मिळाली आहे, त्यामुळे गूगल ने क्वालिटी कंट्रोलला सांगून असे सर्व ॲप काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत ह्याचा फटका जगभरातील एन्डरॉईड मोबाईल युझर्सना बसू शकतो. युझर्सची सुरक्षा आणि प्रायवसी लक्षात घेऊन हे गूगल कडून पाऊल उचलण्यात आले आहे. आधार अपडेट संदर्भात (uidai) युआयडीएआय ह्या सरकारी संस्थेने आधार कार्ड अपडेटची मुदत १४ सप्टेंबर पर्यंत वाढवली आहे. १० वर्ष जुने आधार कार्ड असेल तर तुम्ही ते १४ सप्टेंबर पर्यंत (uidai) युआयडीएआयच्या साईट वरून मोफत अपडेट करू शकता. किंवा आधार सेंटरला जावून ५० रुपये चार्ज देवून अपडेट करू शकता ट्राय (try) ने फेककॉल आणि संदेशला आळा घालण्यासाठी जिओ, आयडिया, एअरटेल,वोडाफोन, बीएसएनएल सारख्या टेलीकॉम कंपन्यांसारखे नोंदणी नसलेले संदेश आणि कॉल ओळखून ब्लॉक करावे असे निर्देश टेलीकॉम कंपन्यांना ट्रायकडून देण्यात आले.
१ सप्टेंबर पासून काही युझर्सना बँकिंग कॉल आणि संदेश मिळण्यास उशीर होवू शकतो. ट्रायने १ सप्टेंबर २०२४ पासून ott लिंक apk किंवा call back नंबर असलेले संदेश ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत, त्यामुळे तुम्हाला ऑनलाईन पेमेंट किंवा ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर तुम्हाला काही अडचणीचा सामना करावा लागु शकतो.
क्रेडीट कार्ड आणि युपीआय ट्रान्सेक्षन फी तुमच्या रूपे रिवोर्ड मधून कापले जाणार नाही, असे एनपीसीसीआयकडून सर्व बँकांना माहिती देण्यात आली आहे. हा नियम १ सप्टेंबर २०२४ पासून लागू होणार आहे. त्यामुळे डीजिटल पेमेंट, गुगल, आधार अशी जी काही कामे खोळंबलेली असतील किंवा पूर्ण करायची राहिली असतील तर ती लवकरच पूर्ण करावी आणि १ सप्टेंबर पासून या सर्व नियमांचे पालन करावे.
