अजित पवारांकडून सभेमध्ये महिलांना खोचक टोला……….

सविस्तर वृत्त: महायुती सरकारकडून विधानसभा निवडणुकीला घेऊन अनेक योजनांचा सपाटा लावला आहे आणि अनेक ठिकाणी या योजनांना घेऊन सभा ही घेतल्या जात आहेत. त्यातच महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभा घेतली होती. त्याच सभेत महायुतींच्या अनेक विषयांवर अजित पवार यांनी सभेमधील जमलेल्या माणसांना संबोधित करत असता,बोलताबोलता त्यांनी अचानक सभेमध्ये असलेल्या महिलांसाठी काही उद्गार काढले, “त्यांनी असे सांगितले की, आपल्या परिवाराला थोडे लहान ठेवा दोन मुलांपेक्षा जास्त मुले जन्मास घालू नये.

टाइम्स ऑफ इन्डीयाच्या रिपोर्ट नुसार, अजित पवार यांनी हे सांगितले कि, तुम्ही मुलांना जन्म देता आहात तर हे देवाच्या कृपेने होत नसते तर तुमच्या पतीमुळे होत असते ह्याच्यामध्ये कोणतीही दैवी शक्ती हस्तक्षेप करत नाही. मी सर्व जाती आणि धर्मातील महिलांना सांगू इच्छितो की, “तुम्ही दोनच मुलांना जन्म दया. कारण तुम्ही दोनच मुलांवर सीमित राहिलात आणि तुमचा परिवार लहान राहिला तर तुम्हाला मुलांची चांगली संगोपन करता येईल”. आणि सर्वांना चांगले शिक्षण आणि खूप चांगले जीवन देता येईल. असे अजित पवारांनी महिलांना सभेत सांगितले.
शुक्रवारी भाषणाच्या दरम्यान अजित पवारांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने अंतर्गत महिलांना जे पैसे मिळाले आहेत त्याबद्दल त्यांनी सांगितले “मी सर्वांना आश्वासित करतो की, आम्ही या योजनेचे पैसे पुन्हा परत घेणार नाही”. ह्या योजनेअंतर्गत जे आरोप होत आहेत त्याचे त्यांनी खंडन केले आहे. महायुतीचे आमदार रवी राणा यांनी मागेच एका कार्यक्रमात बोलताना सांगितले होते की, महायुतीच्या गठबंधनाच्या उमेदवारांना येत्या विधानसभा निवडणुकीत महिलांनी मतदान नाही केल्यास आलेले पैसे महिलांकडून परत घेतले जातील अशी उत्तरे महायुती सरकारच्या आमदारांकडून आले आहे, याच गोष्टींच्या आधारावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभेमध्ये सारवासारव करण्याचा प्रयत्न केला .
