दहावी आणि बारावी च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी…..

सविस्तर वृत्त: दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, छ. संभाजी नगर ,मुंबई ,कोल्हापूर ,अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाण पत्रक (इयत्ता बारावी) ही परीक्षा दर वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात तसेच माध्यमिक (इयत्ता दहावी) ह्यांची परीक्षा मार्च च्या पहिल्या आठवड्यात घेतल्या जातील.
बोर्डाच्या प्रसिद्धी पत्रकात परीक्षांचा ऑनलाईन निकाल मे च्या शेवटच्या किंवा जूनच्या पहिल्या हप्त्यात जाहीर होईल. असा अंदाज बोर्डाने वर्तविला आहे. त्यानंतर अनुत्तीर्ण तसेच श्रेणी सुधार अंतर्गत प्रविष्ट विद्यार्थ्यांसाठी ऑगस्ट पुरवणी साधारण येत्या जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात घेण्यात येईल.
विद्यार्थ्यांच्या पुढील वर्षांची प्रवेश प्रक्रिया वेळेवर होणे हा ह्या मागचा उद्देश आहे. आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा ह्या या परीक्षांनंतर आयोजित केल्या जात असल्याने अश्या परीक्षांचा अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा तसेच पुरवणी परीक्षा वेळेत घेऊन त्याचा निकाल जाहीर कारणे या सर्वांचा सारासार विचार करून सन २०२५ ची फेब्रुवारी-मार्च मध्ये घेण्यात येणारी दहावी आणि बारावी ची परीक्षा नेहमी पेक्षा आठ ते दहा दिवस आधी आयोजित करण्याचा मानस महाराष्ट्र शैक्षणिक बोर्डाचा असून त्या अनुषंगाने लेखी प्रात्येक्षिक व इतर परीक्षा पुढील तारखांना घेण्याचे नियोजित आहे. असे महाराष्ट्र शैक्षणिक बोर्डाने म्हटले आहे. उच्च माध्यमिक प्रमाण पत्र परीक्षा सर्व साधारण व द्विलक्षी विषय व उच्च माध्यमिक व्यवसाय व अभ्यासक्रम दिनांक ११ फेब्रुवारी २०२५ ते १८ मार्च २०२५ प्रात्यक्षिक,श्रेणी,तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन दिनांक २४ जानेवारी २०२५ ते १० फेब्रुवारी २०२५ पर्यंत,तसेच माध्यमिक शालांत (इयत्ता १० वी)ची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२५ ते १७ मार्च २०२५ पर्यंत प्रात्यक्षिक, श्रेणी ,तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन ०३ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी २०२५ पर्यंत ह्या तारखांमध्ये बदल काही कारणास्तव होऊ शकतो. असे बोर्डाने सांगितले आहे . तारखांमध्ये बदल झाल्यास महाराष्ट्र शैक्षणिक मंडळ हे विद्यार्थ्यांना अगोदर जाहीर करतील.
