महाड राड्या वरून मंत्री भरत शेठ गोगावले आक्रमक

दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चाप दाबायचा, हा तटकरेंचा गेल्या अनेक वर्षांचा हातखंडा आहे गोगावले कडून आरोप

सविस्तर वृत : महाड येथील गोगावले आणि तटकरे समर्थकांमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी विकास गोगावले, महेश गोगावले आणि विजय मालुसरे यांच्यावर २१ विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेवर बोलताना मंत्री भरत गोगावले यांनी थेट सुनील तटकरेंवर आरोप केले. त्यांच्या मते, महाडमधील हा राडा तटकरेंच्या डॅमेज करण्याच्या षडयंत्राचा भाग आहे.  गोगावले यांनी म्हटले की, “दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चाप दाबायचा, हा तटकरेंचा गेल्या अनेक वर्षांचा हातखंडा आहे.” त्यांनी रोहा येथील निवडणुकीत भाजप कार्यकर्त्याला मारहाण झाल्याचा आणि आपल्या कार्यकर्त्यांकडून कधीही भानगड झाली नसल्याचा दावा केला.

आपल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबतच्या आरोपांना उत्तर देताना, त्यांनी १९९७ मधील घटनेची कबुली दिली, परंतु त्यानंतर त्यांच्यामुळेच एमआयडीसी परिसरात शांतता प्रस्थापित झाल्याचे सांगितले. ते म्हणाले की, “आम्ही कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून चाप दाबलेला नाही. जो इव्हिडन्स घडला, तो आम्ही स्वतः केला आणि मान्य केले.” शांत महाडमध्ये दूषित वातावरण निर्माण करण्याचे काम तटकरेंकडूनच होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *